King Cobra Shocking Video : जगातील सर्वात विषारी सापांच्या यादीत किंग कोब्रा अव्वल स्थानी आहे, कारण त्याच्या एका दंशाने माणसाचा क्षणात मृत्यू होऊ शकतो. यात आता पावसाचे दिवस सुरू असल्याने जंगलात अनेक ठिकाणी सापांचा वावर दिसून येतो. अगदी धबधब्यात, नदीकाठी मोठ्या संख्येने साप शिकारीच्या शोधात फिरताना दिसतात. अशाचप्रकारे उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ केम्प्टी धबधब्यात अनेक पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते. यावेळी शेकडो पर्यटकांच्या गर्दीत अचानक एक भलामोठा किंग कोब्रा साप पोहताना दिसला, ज्याला पाहून पर्यटक जीव तोडून इकडे तिकडे धावू लागते. यानंतर असे काही घडले की पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

ही घटना शनिवारी दुपारी घडल्याचे सांगितले जात आहे. लोकांच्या गर्दीतही तो लांबलचक किंग कोब्रा इतक्या स्पी़डने तरंगत जात होता की, कोणाच्या हाती लागणंही कठीण होतं. लोकांनी सापापासून अंतर ठेवून मोठ्या कष्टाने आपले प्राण वाचवले. पण, या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्हीही पावसाळ्यात धबधब्यात भिजण्यासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर काळजी घ्या.

जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

व्हिडीओत पाहू शकता, धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याखाली एकावेळी शेकडो पर्यटक भिजण्याचा आनंद घेत आहेत. त्याचवेळी एका पर्यटकाला किंग कोब्रा पाण्यात पोहताना दिसतो. तो पर्यटक काही सांगायच्या आतच अनेक पर्यटकांचे लक्ष त्या किंग कोब्रावर पडतं आणि ते घाबरून जोरजोरात ओरडू लागतात. फणा पसरून किंग कोब्रा जसजसा पर्यटकांच्या दिशेने पोहत येतो, तसे तसे पर्यटकही जीव वाचवण्यासाठी जागा मिळेल तिथे पळू लागतात. अनेक पर्यटकांच्या अगदी बाजूने किंग कोब्रा जातो, पण सुदैवाने कोणालाही दुखापत करत नाही. अखेर शेवटी तो धबधब्याच्या किनाऱ्यापर्यंत येऊन थांबतो. पर्यटकांची गर्दी इतकी जास्त होती की, त्यामुळे मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर काही लोकांनी तातडीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पर्यटकांना शांत केले. यादरम्यान, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या काही लोकांनी पाण्यात तरंगणाऱ्या त्या सापाचा व्हिडीओदेखील बनवला.

धबधब्यात भिजणाऱ्या लोकांच्या गर्दीच किंग कोब्राची एन्ट्री (Snake Entered In Kempty Falls Video)

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, साप पाण्याच्या प्रवाहासोबत आला होता आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. त्यांनी पर्यटकांना नैसर्गिक स्थळांवर सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

किंग कोब्राचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यावर लोकही मजेशीर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, हा साप पर्यटकांना पोहण्यास शिकवण्यासाठी आला. दुसऱ्याने लोकांना सल्ला दिला की, पावसाळ्यात अशा ठिकाणी भिजताना थोडी सावधगिरी बाळगा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.