सुरतच्या दुकानात विकला जातोय ‘कुल्हड पिझ्झा’; व्हिडीओ होतोय व्हायरल

आतापर्यंत तुम्ही ‘कुल्हड चहा’ ऐकला असेल, पण ‘कुल्हड पिझ्झा’ कधी पाहिलाय का? नाही, तर हा व्हिडीओ एकदा नक्की पहा.

kulhad-pizza
(Photo: Youtube/ Aamchi Mumbai)

बऱ्याच लोकांना पिझ्झा आवडतो. शाळेतल्या मुलाला जरी विचारलं, बाळा तुला काय खायचं आहे? त्याचं उत्तर पिझ्झा म्हणून असतंच. गाव असो की शहर पिझ्झा खूपच स्पेशल पदार्थ बनलेला आहे. पार्टीमध्ये किंवा चार मित्र मैत्रिणी एकत्र भेटल्यावर काय खायचे हा विचार केल्यावर पिझ्झा या शब्दावर सर्वांचं एकमत बनतंच. पिझ्झा आवडत नाही असं सहसा कुणी म्हणत नाही. आतापर्यंत तुम्ही मातीच्या भांड्यात तयार केलेला ‘कुल्हड चहा’ ऐकला असेल पण ‘कुल्हड पिझ्झा’ कधी ऐकलाय का? होय, कुल्हड पिझ्झा ही नवी डिश भारतात आली आहे. गुजरातच्या सुरतमधील एका दुकानात विकला जाणारा हा ‘कुल्हड पिझ्झा’ची सध्या बरीच चर्चा सुरूय. मातीच्या कपात वितळलेलं चीज या पिझ्झामध्ये भरलं जातं. ‘कुल्हड’ हा एक प्रकारचा मातीचा बनलेला कप आहे.

‘आमची मुंबई’ नावाच्या यूट्यूब चॅनलने मार्चमध्ये या ‘कुल्हड पिझ्झा’चा एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘कुल्हड पिझ्झा’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाव प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत २३ लाख व्ह्यूज मिळाले असून पिझ्झाप्रेमींना अक्षरशः वेड लावलंय. नव्याने आलेल्या या ‘कुल्हड पिझ्झा’ने पिझ्झाची संकल्पनाच बदलून टाकली आहे. हा ‘कुल्हड पिझ्झा’चा व्हायरल व्हिडीओ पाहून पिझ्झाप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटलं आहे.

सुरतमधली ‘द कोन चाट’ या दुकानात हा ‘कुल्डह पिझ्झा’ विकला जातोय. हा पिझ्झा कसा बनवला जातो, हे सुद्धा या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलंय. ‘कुल्हड पिझ्झा’ बनवण्यासाठी प्रथम मिश्रण तयार केले. एका वाडग्यात त्याने उकडलेले कॉर्न, चिरलेला टोमॅटो, पनीरचे तुकडे आणि अंड्यातील बलक आणि टोमॅटो केचप सारखे अनेक सॉस घेतले. पुढे त्याने चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, मीठ आणि चाट मसाला यांचं मिश्रण तयार केलं.

मग त्याने हे सर्व मिश्रण एका कुल्हडमध्ये भरलं. त्यात सॉस आणि लिक्विड चीज टाकून वर ठेवलं. मग, त्याने मोझारेला चीजसह आणखी काही मिश्रण मिक्स केले. पुढे त्याने पिझ्झा शिजवण्यासाठी कुल्हड मायक्रोवेव्हमध्ये ठेवले. कुल्हड पिझ्झामधल्या वितळलेल्या चीजवर चिरलेली कोथिंबीर घालून यूट्यूबरला देण्यात आली.

मातीच्या भांड्यातल्या या ‘कुल्हड पिझ्झा’ ची किंमत केवळ ८० रूपये इतकी आहे. या ‘कुल्हड पिझ्झा’ने सर्वच पिझ्झाप्रेमींना सुखद धक्का दिलाय. आतापर्यंत कुल्हडमध्ये गरमा गरम चहाचा आस्वाद अनेकांना घेतला असेल. पण याच कुल्हडमध्ये गरमा गरम पिझ्झाचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे.

या ‘कुल्हड पिझ्झा’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावरील युजर्सनी आणि पिझ्झाप्रेमींनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. हा नवा पिझ्झा युजर्सच्या पसंतीला पडताना दिसून येतोय.

युट्यूबवर या व्हिडीओला आतापर्यंत २,२७४,३९९ इतके व्ह्यूज मिळाले आहेत. ३८ हजारपेक्षा जास्त लोकांनी या कुल्हड पिझ्झाला लाईक्स दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kulhad pizza selling in shop of surat internet reacts to viral video prp

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी