मध्य प्रदेश राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये प्रथमच महिला वाईन शॉप्स सुरू होणार आहेत. एप्रिल २०२२ पर्यंत तुम्हाला मध्य प्रदेशात महिलांसाठी असे खास दुकान पाहायला मिळेल. उमा भारतीसारख्या महिला नेत्या राज्यात दारूविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, मध्य प्रदेश सरकार महसूल वाढवण्याबाबत तितकेच ठाम आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी भरण्यासाठी सरकार महिलांसाठी वाईन शॉप सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘या’ शहरात होणार सुरु वाईन शॉप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश सरकार सुरुवातीला राज्यातील चार महानगरांमध्ये महिलांसाठी खास वाईन शॉप्स उघडणार आहे. दिल्ली-मुंबई मेट्रो सिटीच्या धर्तीवर मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला असून या दुकानांमध्ये महिलांसाठी सर्व ब्रँडची वाईन उपलब्ध असेल. या चार शहरांमध्ये भोपाळ, जबलपूर, इंदूर आणि ग्वाल्हेरचा समावेश आहे. याठिकाणी केवळ महिलांना अनुकूल मद्य विक्री केली जाईल.

( हे ही वाचा: IND vs NZ: कसोटीत मालिकेत श्रेयस अय्यरचे पदार्पण, सुनील गावस्करकांडून मिळाली कॅप; खास क्षण कैमेऱ्यात कैद )

महिलांच्या सुरक्षेचीही काळजी घ्या!

महिलांना कोणत्याही त्रासाशिवाय या वाईन शॉपचा आनंद घेता यावा यासाठी मध्य प्रदेश सरकारकडूनही विशेष काळजी घेतली जाणार आहे. एप्रिलपर्यंत दुकाने सुरू राहणार असली तरी ती आठवड्यातून काही दिवसच सुरू राहणार आहेत. तसेच महिलांसाठी हे वाईन शॉप मॉल्ससारख्या सुरक्षित ठिकाणी आयोजित केले जातील. जेणेकरून महिलांना तिथे सहज जाता येईल आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल.

( हे ही वाचा: बाल्कनीत कपडे सुकवण्याच्या नादात वृद्ध महिला १९व्या मजल्यावरून पडली; थरारक दृश्य कैमेऱ्यात कैद )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांसाठीही वाईन फेस्टिव्हल!

महिलांच्या या वाईन शॉपला मिळणारा प्रतिसादही मध्य प्रदेश सरकार चाचपणी करणार आहे. त्यानंतर महिलांना वाईन शॉपमध्ये येण्यासाठी तसेच वाइन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. त्यासाठी वाईन फेस्टिव्हलही आयोजित करता येईल. दरम्यान, यासंदर्भात महसूल विभागाला अद्याप कोणतेही ठोस आदेश मिळालेले नसून, नजीकच्या काळात मध्य प्रदेशातील महिलांच्या वाईन शॉपचे चकाचक दृश्य पाहायला मिळू शकते.