Propose Video: मुलीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; मग पुढे जे काही झालं ते पाहून विश्वास बसणार नाही…

सध्या असंच एक मजेशीर प्रकरण सर्वांच्या चर्चेचं कारण बनलं आहे. शाळेत शिकणाऱ्या एका मुलीने असंच एका मुलाला प्रपोज केलं, जे चांगलंच व्हायरल झालं आहे. शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थी आणि विद्यार्थीनीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

girl-and-boy-funny-video-trending-video
(Photo: Instagram/ bhutni_ke_memes)

सोशल मीडियाच्या जगात कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील हे सांगता येत नाही. या माध्यमाचा वापर कधी ट्रोलिंगसाठी केला जातो. तर कधी त्यावरील एखादी गोष्ट पाहून हसू आवरत नाही. सध्या असंच एक मजेशीर प्रकरण सर्वांच्या चर्चेचं कारण बनलं आहे. आपलं प्रेम सर्व जगासमोर जाहीर करण्याचं माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापर हा काही नवीन नाही. शाळेत शिकणाऱ्या एका मुलीने असंच एका मुलाला प्रपोज केलं, जे चांगलंच व्हायरल झालं आहे. शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थी आणि विद्यार्थीनीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

स्त्री-पुरूष समानता हा सध्याचा विकासाचा मंत्र बनला आहे. कोणत्याही क्षेत्रात महिला पुरूषांपेक्षा मागे नाहीत हे नारीशक्तीने सिद्ध केलं आहे. कार्पोरेट क्षेत्रापासून ते अगदी युद्धभूमीपर्यंत सर्वत्र स्त्रिया महिलांच्या बरोबरीने आपापल्या भूमिका चोख बजावताना दिसत आहेत. लग्नासाठी प्रपोज करण्याच्या पद्धतीत देखील आता असाच काहीसा ट्रेंड दिसू लागला आहे. पूर्वी मुलगा गुडघ्यावर बसून मुलीला प्रपोज करत असे. पण सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाळेत शिकणारी एक मुलगी स्वत: गुडघ्यावर बसून मुलाला प्रपोज करताना दिसते आहे.

हा व्हायरल व्हिडीओ नेमकी कुठला आहे आणि कधी शूट केला गेलाय, याबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. पण यामध्ये मुलीने तिच्यासोबत शिकणाऱ्या मुलाला अगली फिल्मी स्टाईलने प्रपोज केलेलं पाहून मुलगा आश्चर्यचकित झाला. शाळा संपल्यानंतर हा मुलगा त्याच्या घराकडे निघाला होता. पाठीवर दप्तर लटकवत हा मुलगा रस्त्याने जात असतानाच एक मुलगी रस्त्याच्या मध्ये उभी राहिली आणि समोरून येणाऱ्या मुलाला थांबवलं.

काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मुलगा रस्त्यात थांबताच मुलगी त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करते. अगदी बॉलिवूडच्या चित्रपटासारखं गुडघ्यावर बसून या मुलीने ‘आय लव्ह यू’ म्हणत तिने मुलाला प्रपोज केलं. सारं वातावरण खूपच रोमँटिक झालं होतं. हे पाहून मुलगा सुद्धा लाजत गालातल्या गालात हसताना दिसून येतोय. मुलाकडू काहीच उत्तर येत नाही म्हणून ही मुलगी त्याच्याकडे हात पसरवत आपलं प्रेम जाहीर करते. हे ऐकल्यावर मुलगा तिला सॉरी म्हणू लागतो. पण मुलगी त्याला वारंवार ‘असं करू नको’ असं म्हणताना दिसून येतेय.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मात्र, काही क्षणांनंतर मुलगा या मुलीचं प्रपोजल स्वीकारतो. तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या मुलीने हा क्षण तिच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहेत. दरम्यान, या सर्व प्रसंगाचा व्हिडीओ समोर आला आहे. मुलगी प्रपोज करताना मुलाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. हा व्हिडीओ एका प्रॅंकचा सुद्धा एक भाग असू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ladka ladki ka video girl and boy funny video ladki ka video viral video google trends today school girl expressed her love cant believe what happened next omg video goes viral prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या