अर्जेंटिना या लॅटिन अमेरिकन देशामध्ये एक महिला न्यायाधीश एका कैद्याला किस करताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. चुबुत प्रांतात एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी हा कैदी दोषी आढळला. विशेष म्हणजे या महिला न्यायाधीशाने या घटनेच्या एका आठवड्यापूर्वी कैदी क्रिश्चियन ‘मे’ बूस्टोसची जन्मठेपेची शिक्षा कमी करण्याचा देखील प्रयत्न केला होता. मारिएल सुआरेझ असं या महिला न्यायाधीशाचं नाव आहे.

मारिएलला २९ डिसेंबर रोजी तुरुंगात एका कैद्याला किस करताना घेताना पकडण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, २००९ मध्ये पोलीस शिपाई लिओनार्डो टिटो रॉबर्ट्सच्या हत्येसाठी कैदी बूस्टोसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या टीमचा मेरीएल भाग होती.

बूस्टोसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाविरुद्ध मत देणारी मारिएल टीममधील एकमेव न्यायाधीश होती. तेव्हा बूस्टोस हा अतिशय धोकादायक कैदी आहे, असं तिला सांगण्यात आलं होतं. परंतु बूस्टोसला वाचवण्याचा मेरीएलचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि आता त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ही शिक्षा गेल्या आठवड्यातच सुरू झाली आहे. दुसरीकडे, मेरीएलने आता या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

मेरीएल म्हणाली, “मी त्याला पहिल्यांदाच पाहिले आणि आम्ही त्याच्या शिक्षेबद्दल बोललो. मी त्याच्याशी धडकले होते तेव्हा मी त्याला सांगितले की मी त्याच्यासाठी एका मुलाखतीची व्यवस्था करायला जात आहे. मी एक पुस्तक लिहिणार असल्याचेही सांगितले. कैद्यासोबत आपले कोणतेही भावनिक नाते नसल्याचेही त्यांनी सांगितले. मी या प्रकरणावर एक पुस्तक लिहित आहे म्हणून मी कैद्याला भेटायला गेले.” दरम्यान, चुबुत प्रांतातील अधिकार्‍यांनी महिला न्यायाधीशांविरुद्ध तिच्या गैरवागणुकीबद्दल शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.