नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही वर्किंग वुमनला घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना प्रत्येक दिवशी तारेवरची कसरत करावी लागते. घरातली कामं, मुलांची दुखणीखुपणी, ज्येष्ठांचं आजारपण, पाहुणे असं सगळं सांभाळत नोकरीतही आपली जागा टिकवून ठेवणं याला कमालीचं कौशल्य लागतं. अशी जिद्द दाखवून एक सफाई कामगार आणि आई या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या पाठीवर बाळाला बांधून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. अशीच एक राणी लक्ष्मी ओडिशात दिसून आली, जी आपल्या लहान बाळाला पाठीवर बांधून सफाई कामगाराची जबाबदारी पार पाडत आहे. ही महिला सफाई कामगार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलीय. या व्हायरल व्हिडीओमधल्या महिलेचं नाव लक्ष्मी मुखी असं आहे. ओडिसामधल्या मयूरभंज जिल्ह्यात त्यांची ड्यूटी असते. त्यांच्या कुटुंबात इतर कोणीही नाही. म्हणूनच त्यांच्यावर आपल्या तान्ह्या बाळाला पाठीला बांधून काम करण्याची वेळी आलीय. त्या गेल्या १० वर्षापासून बारीपाडा नगरपालिकेत काम करत आहेत. घरात बाळाला सांभाळण्यासाठी दुसरं कुणीही नसल्यामुळे नाईलाजास्तव बाळाला घेऊन त्यांना ड्यूटी करावी लागतेय. पण याबद्दल त्यांना कोणतीही खंत नसल्याचं त्या सांगतात. “ही माझ्यासाठी समस्या नाही, माझे कर्तव्य आहे”, असं त्या मोठ्या अभिमानाने सांगतात.

आणखी वाचा : चक्क पोपटाने महिलेला ‘आई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली, दोघांमधील संभाषणाचा हा VIDEO VIRAL

कडाक्याच्या उन्हात आणि अंगाची लाही लाही होत असताना त्या आपल्या तान्ह्या बाळाला पाठीवर घेऊन झाडू मारताना दिसत आहेत. आईपेक्षा आणखी दुसरा मोठा योद्धा कोणीच असू शकत नाही, हे या व्हायरल व्हिडीओवरून दिसून येतंय. ओडिसामधल्या लक्ष्मी मुखी यांचे बाळाला घेऊन ड्यूटी करत असतानाचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटोज आणि व्हिडीओज एक महिला सशक्तीकरणाचे दर्शन घडवत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : फाईव्ह स्टार हॉटेलचा कर्मचारी आहे ‘हा’ कुत्रा, त्याची कमाई ऐकून थक्क व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : आधी धू धू धुतलं…मग दोघांनी हात मिळवले, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा गोंधळून जाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ANI या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या महिलेचा फोटोज आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यानंतर बघता बघता हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल देखील झाले आहे. बाळाला पाठीवर घेऊन ड्यूटी करणाऱ्या लक्ष्मी मुखी या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चेत आल्या आहेत. हे व्हायरल फोटो आणि व्हिडीओ पाहून सारेच जण या मातेला सलाम ठोकत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. प्रत्येक जण या महिलेचं कौतुक करताना दिसून येत आहेत.