Lalbaugcha raja 2025 last video: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईसह राज्यभरात सकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली. नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागचा राजाला पाहायला भाविकांची प्रचंड गर्दी आपण पाहिली. मुख दर्शनाची रांग असो किंवा चरण स्पर्श, भाविक तासनतास रांगेत उभे असतात. अशावेळी…

अशा वेळी ११ दिवस सुरू असलेली भाविकांची गर्दी अखेर बाप्पाला निरोप देण्याच्या काही तास अगोदर विसर्जनाच्या तयारीसाठी म्हणून दर्शनाच्या रांगा बंद करतात. चरण स्पर्श रांग ४ सप्टेंबर २०२४ रोजी बंद झाली आणि मुख दर्शन रांग शुक्रवारी १२ वाजता बंद झाली. यावेळी लालबागचा राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरवी लाखोंच्या गर्दीत मानानं वावरणारे कार्यकर्तेही या तरुणासोबत अचानक फोटो घेताना दिसले.

लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीही मोठी रांग असते. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागचा राजाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजता मुखदर्शनाची रांग बंद करण्यात आली. यानंतर भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते.लालबागचा राजाची मुखदर्शनाची रांग बंद होताना काही भाग्यवंतांना राजाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लालबागचा राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेतील शेवटचा भक्त दिसत आहे. या शेवटच्या भक्ताचा लालबागचा राजा मंडळाकडून सत्कार करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर अनेकजण या व्यक्तीला ‘भाग्यवंत’ म्हणत आहेत.

लालबागचा राजाच्या मुखदर्शनाच्या लाईनमधील शेवटचा भाग्यवंत भक्त कोण?

लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेला तरुण तासाभरापूर्वी रांगेत चेंगरा-चेंगरीमध्ये उभा होता, मात्र काही वेळातच तो व्हीआयपी झाला. शुक्रवारी रात्री १२ वाजता लालबागचा राजाच्या मुखदर्शनाची रांग बंद करण्यात आली, ज्यामुळे त्यानंतर भाविकांना मंडपात प्रवेश मिळाला नाही. मात्र, या रांगेतील काही भाग्यवान भाविकांना तरीही लालबागचा राजाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. यावेळी लालबागचा राजाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या शेवटच्या समूहामधील तो शेवटचा व्यक्ती दर्शन रांगेमध्ये प्रवेश करू शकला, म्हणून त्याला “सर्वात भाग्यवान व्यक्ती” म्हटले गेले. या प्रसंगी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात रांगेतील शेवटचा भक्त लालबागचा राजाच्या दर्शनासाठी पुढे जाताना दिसतो.

पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ jara_hatkeyoutube नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत लिहिले, “लालबागचा राजा २०२५ मुखदर्शनातील आतील शेवटच्या भाविकांचे स्वागत कार्यकर्त्यांनी भावनिक क्षणात केले. ” नेटकऱ्यांनीही व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली एकानं म्हंटलंय, “तो खूप नशीबवान आहे, बाप्पाला खरोखर त्याला पाहायचे आहे,” तर आणखी एकानं कमेंट करत “वेळ बदलायला वेळ लागत नाही, भाऊला VVVIP सारखे वागवले गेले,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.