वेगवेगळ्या मेसेजिंग अॅप्समुळे आपण हल्ली टेक्सच्या माध्यमातून एमकेकांशी संवाद साधतो. दिवसभर आपण एवढे व्यस्त असतो की आपल्याला चॅटिंग करायला तेवढा वेळ नसतो. पण जसा रात्रीचा वेळ मिळतो तसा आपल्यातला तो सोशल अॅडिक्टेड किडा जागा होतो. दर सेकंदला मेसेज अलर्ट येतात. आपण सोशल मीडियावर अधिक अॅक्टीव्ह होतो. चॅटिंग करतो. एकमेकांशी संवाद साधतो. पण रात्रीच्या वेळी सुरू असलेली चॅटिंग तुमचे खासगी आयुष्य एकमेकांसमोर अगदी सहजपणे उघड करु शकते.

Viral Video : सफरचंद सोलण्याची भन्नाट पद्धत

एका संशोधनानुसार रात्री सुरू असलेल्या चॅटिंगमुळे तुम्हाला एखाद्याच्या मनाचा अचूक ठाव घेता येऊ शकतो. यावेळी आजूबाजूची शांतता, भकास आणि उदासिनता मनावर अधिक घर करते, त्यामुळे चॅटिंग करताना मुले किंवा मुली आपली दु:खं फारसा विचार न करता बोलून दाखवतात. एरव्ही आपले खासगी आयुष्य सहजासहजी उघड न करणारे मात्र लेट नाईट चॅटिंगमध्ये आपल्या मनातली दु:ख, इच्छा व्यक्तीसमोर अधिक सहजतेने बोलून जातात.

वाचा : रात्री ‘हे’ पदार्थ खाणे आवर्जुन टाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण कोण आहोत? आपल्याला काय हवे? अशा अनेक इच्छा दोन्ही व्यक्ती एकमेंकासमोर उघड करून मोकळे होतात. आतापर्यंत केलेल्या चुकीची कधी कधी प्रांजळ कबुलीही समोरच्या व्यक्तीसमोर देऊन जातात. रात्रीचा संवाद हा अधिक भाविनक होत जातो. अशा वेळी दोघेही आपल्या दुखाला वाट मोकळी करून देतात असेही यात म्हटले आहे. त्यामुळे साधलेल्या संवादातून तुमचे आणि त्या व्यक्तीमधले नाते अधिक घट्ट बनते यात काही शंका नाही. पण कधी कधी असे संवाद तुमचे वैयक्तिक आयुष्य नको तितक्या प्रमाणातही समोरच्या व्यक्तीसमोर उघड करण्यास कारणीभूत ठरते असेही म्हटले आहे.