‘मोनालिसा’ ही जगप्रसिद्ध कलाकृती साकारणाऱ्या लिओनार्दो दा विंचीच्या चित्रांना आजही जगभरात मोठी मागणी आहे. नुकताच त्याच्या एका चित्राचा लिलाव अमेरिकेत पार पडला. हे पेंटींग आहे येशू ख्रिस्तांचे, तेही ५०० वर्षे जुने. लिलावात या चित्राला मिळालेली किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. खरेदीदाराने तब्बल ४५ कोटी डॉलर म्हणजेच ३ हजार कोटी रूपये मोजून हे चित्र विकत घेतले.
Viral Video : तिच्या भन्नाट डान्समुळे ‘जुडवा २’ गाणं पुन्हा आलं चर्चेत
यातील विशेष आणि नोंद करण्यासारखी बाब म्हणजे खरेदीदाराने फोनवर या चित्रासाठी बोली लावली. या खरेदीदाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. येशू ख्रिस्तांच्या या पेंटिंगचं नाव ‘साल्वाडोर मुंडी’ असे आहे. या पेंटिंगच्या किंमतीने २०१५ मध्ये झालेल्या पिकासोच्या पेंटिंगच्या लिलावाचे रेकॉर्डही तोडले आहे. लिलाव झालेले येशू ख्रिस्तांचे ५०० वर्षांपूर्वीचे पेंटींग हरवले होते. कालांतराने या पेटिंगचा शोध लागला. १९५० मध्ये या पेंटिंगची किंमत केवळ ३९०० रुपये होते. २००५ मध्ये पुन्हा त्या पेंटिंगचा १० हजार डॉलर्सना लिलाव करण्यात आला होता. तर याच वर्षी रशियाच्या अब्जाधीशानं हे पेंटिंग १२.७५ कोटी डॉलरला विकत घेतलं होतं.
Video : पत्नीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी हा ‘वीरू’ चक्क मोबाईल टॉवरवर चढला