सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतात. कोणता व्हिडीओ कसा व्हायरल होईल सांगता येत नाही. त्यातल्या त्यात प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ नेटकरी डोक्यावर घेतात. प्राण्याच्या हरकती, त्यांची शिकार करण्याची पद्धत नेटकरी आवर्जून बघतात. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जाते. त्याचा जंगलात दरारा असतो. सिंह शिकार करून आपलं पोट भरतो. त्यामुळे या प्राण्यांची शिकारीची हद्द निश्चित असते. आपल्या हद्दीत दुसरा प्राणी आली की त्यांना आवडत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात? याचा अंदाज येईल. साधारणपणे बिबट्या त्याच्या वजनापेक्षा कितीतरी पटीने जास्त वजनाच्या प्राण्याची सहज शिकार करतो आणि त्याच्या ओढून झाडावर घेऊन जातात.
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या जंगलातून चालताना दिसत आहे, एक सिंहीण रस्त्याच्या मधोमध झोपलेली दिसत आहे. सिंहिणीला पाहताच बिबट्याचा थरकाप उडतो. सिंहीणीशी लढण्याचे धैर्य एकवटण्याऐवजी बिबट्या आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो जशी सिंहिणीची झोप मोडते तसा बिबट्या धूम ठोकतो.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.