Leopard attacked video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो.सामान्यतः वाघ, सिंह आणि बिबट्या हे जंगलात अतिशय धोकादायक शिकारी प्राणी मानले जातात.कितीही मोठा प्राणी असूदेत बिबट्याला बघून पळून जातो. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. मात्र बिबट्या हा अतिश हुशार प्राणी आहे, त्याला आपली शिकार कशी शोधायची हे बरोबर माहित असतं. तर दुसरीकडे हरीण किती चपळ प्राणी आहे हेही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. असाच एका शिकारीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये बिबट्या हरणाची शिकार करण्यासाठी आधी लपून बसतो, मग अचानक येतो आणि हरणाची शिकार करताना दिसतो.

दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातील हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये बिबट्या हुशारीनं घात करून हल्ला करताना दिसत आहे. नदीकाठचे पाणी पिऊन परतणाऱ्या हरणावर हल्ला करून शिकार करण्यात बिबट्या यशस्वी होतो. झुडुपांमध्ये लपलेल्या बिबट्याने क्षणात बरोबर वेळ साधून हरणावर हल्ला केला आणि त्या आपल्या जबड्यात पकडून ठेवलं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ klaseriedrift_safari_camps नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रया देत आहेत. एकानं बिबट्याच्या संयमाची आणि प्रयत्नांची प्रशंसा करत म्हंटलंय की, याला “जीवनाचा धडा” म्हणतात. “आपण सर्वांनी जीवनात बिबट्यासारखे असले पाहिजे,” तर आणखी एका वापरकर्त्याने लिहिले. “बिबट्यासरखे तुमच्या संधीची वाट पहा आणि संकोच न करता प्रहार करा.”