सोशल मीडियाच्या जगामध्ये अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यापैकी काही असे असतात जे हृदयस्पर्शी असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सर्वत्र चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकला कुत्र्याच्या पिल्लासह खेळताना दिसत आहे. व्हिडीओ अयोध्येतील शरयू नदीच्या काठावरील आहे. चिमुकल्याच्या गोंडस व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
इंस्टाग्रामवर @_shishir_vyas, नावाच्या अकांऊटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ इतका मनोमोहक आहे की तुम्ही पाहिल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. व्हिडीओमध्ये एक लहान मुल आनंदाने खेळताना दिसत आहे. चिमुकला एका कुत्र्याच्या पिल्ला उचलण्याचा प्रयत्न करत आहे. चिमुकला कुत्र्याच्या पिल्ला उचलतो आणि कुठेतरी जात आहे. चालताना त्याला काही पायऱ्या लागतात. कुत्र्याच्या पिल्लाला उचलून त्याला पायऱ्या चढता येत नाहीये म्हणून तो पिल्ला खाली ठेवतो, मग पायरीवर चढतो आणि पिल्ला पुन्हा उचलतो. नंतर तो पिल्ला पकडून कसा तरी पायऱ्या चढतो. तेवढ्यात तिथे एक पिल्लाची आई(मादी कुत्री) तेथे येते. चिमुकला पिल्लाला त्याच्या आईपाशी ठेवतो. तिथे दुसरे पिल्लू देखील फिरत असते त्यालाही उचलून तो त्यांच्या आईच्या कुशीत ठेवतो. चिमुकल्याच्या या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. हे मोहक दृश्य पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावून हसू येत आहे. नेटकरी वारंवार हा व्हिडीओ पाहत आहे.
हेही वाचा – “मंदिरापेक्षा शाळा जास्त महत्त्वाची”; बिनधास्त अन् बेधडक उत्तर देणाऱ्या चिमुकल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा – व्यक्तीने कावळ्याचा आवाज काढला अन् काही सेकंदात कावळ्यांची भरली शाळा; Viral Video पाहून नेटकरी झाले थक्क
व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त लोकांना आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत चिमुकल्याचे कौतूक केले आहे. “एक चिमुकला दुसऱ्या पिल्लाला घेऊन जात आहे,” असे एका ट्विटर व्हिडीओवर कमेंट कराताना लिहिले. दुसर्याने लिहिले की,”उत्कृष्ट, ते एकत्र खूप छान वेळ घालवत आहेत. आनंद घ्या.” “कुत्र्याची पिल्लं खरोखर आश्चर्यकारक आहेत” असे तिसऱ्याने म्हटले. “हे खूप मोहक आहे…आवडले!!” असे चौथ्याने सांगितले तर पाचवा म्हणाला, “फारच गोडंस आहे”