सोमवार, २२जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली. उद्योगपतींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. दरम्यान, मंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगणाऱ्या एका चिमुकल्याचा जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
“मंदिरापेक्षा शाळा जास्त महत्त्वाची”
देशात अजूनही असे लोक आहे ज्यांनी शिक्षण घेण्यासाठी खस्ता खाव्या लागत आहे. खूप संघर्ष करून शिक्षण घ्यावे लागत आहे. सरकारने शिक्षणाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे पण अशा अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशात सध्या सर्वत्र मंदिराच्या सोहळ्याचा आनंद साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये एका जुन्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओमध्ये एक पत्रकार एका १३ वर्षाच्या मुलाशी सवांद साधताना दिसत आहे. शाळा महत्त्वाची आहे का मंदिर? असा प्रश्न विचारल्यानंतर चिमुकला म्हणतो की शाळा महत्त्वाची आहे.
पत्रकार म्हणतो की, “लोक चांगल्या आयुष्य व्हावे यासाठी मंदिरामध्ये जाऊन पुजा प्रार्थन करतात. त्यावर चिमुकला बिनधास्तपणे उत्तर देतो की, “ मी नाही जात. “मंदिरामध्ये जाण्याऐवजी मी माझ्या आई-वडील आणि गुरुंचा आशीवार्द घेणे पंसत करेल”. पत्रकार मुलाल विचारतो की, “इतक्या लहान वयात तुला इतके ज्ञान कसे काय आहे.” त्यावर चिमुकला उत्तर देतो की, “कारण मी शाळेत जातो. शाळेत मला हे ज्ञान मिळते. मी जर शाळेत जाण्याऐवजी मंदिरामध्ये गेलो असतो तर मला भिक मागवी लागली असती.”
हेही वाचा – व्यक्तीने कावळ्याचा आवाज काढला अन् काही सेकंदात कावळ्यांची भरली शाळा; Viral Video पाहून नेटकरी झाले थक्क
बिनधास्त उत्तरे देणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल
कशाची भिती न बाळगणाऱ्या मुलालाही आयएएस ऑफिसर होऊन देशाची सेवा करायची आहे. पत्रकार जेव्हा त्याला विचारतो की, “जर तू मंदिरात जात नाही तर मग तू आयएएस ऑफिस कसा काय होशील?”मी शाळेत जाऊन शिक्षण घेईल. अभ्यास करेल मग आयएएस ऑफिसर होईल.” व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे ज्यावर नेटकऱ्याच्या विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.
हेही वाचा – Video : चक्क पेन्सिलच्या टोकावर कोरली प्रभू रामाची सर्वात छोटी मूर्ती; कलाकाराची कला पाहून म्हणाल,”जय श्री राम”
व्हिडीओवर एका व्यक्तीने विचारले ” या मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा उचलू शकतो? त्याला काही मदत लागली तर?” जुन्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यासाठी लोकांनी सोशल मीडियाचा वापर केला. दुसरा व्यक्ती म्हणाला, “किती हुशार मुलगा! आशा आहे की तो योग्य ठिकाणी पोहचेल.” काही जण त्याला हुशार म्हणत तर काहींनी शाळांचे महत्त्व मान्य केले. नेटकऱ्यांनी त्यांच्या या धैर्याचे कौतुक केले आहे.