सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहिले जातात. या व्हिडीओची व्ह्यूज आणि लाइक्स पाहिल्यावर याचा अंदाज येतो. प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल आणि स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही. खरं तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाळीव प्राणी आणि पक्षी माणसाप्रमाणेच कृती करताना दिसत आहेत. प्राणी पक्षीप्रेमींना हा व्हिडीओ खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो पुढे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह आवरता येत नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुत्रा, मांजर आणि पोपट माणसांप्रमाणे कृती करताना दिसत आहेत. एक कुत्रा मालकासोबत योगा करत आहे. तर दुसऱ्या ठिकाणी सर्वांसोबत त्यांच्यासारखी कृती करत आहे. मालकासोबत उड्या मारत असल्याचं पुढे आहे. त्यानंतर मांजरही यात मागे नाही. मालकिणीसोबत योगा स्टेप्स करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे भिंतीवर लावलेल्या घडळ्याप्रमाणे शेपटी हलवताना दिसत आहे. सर्वात शेवटी पोपट आपल्या मालकिणीच्या पाय आपटण्याची स्टाईल फॉलो करत आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशू काब्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, “माकडं उगाच बदनाम, या नकलाकारांचा कुठेच सामना नाही”
या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. अनेकजण हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.