‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा सृष्टीचा नियम आहे. जंगल परिसरात तर हे नित्याचेच. एक जीव दुसऱ्यावर अवलंबून असतो. मात्र माणसाने एखाद्या अडचणीत आलेल्या किंवा संकटात सापडलेल्या प्राण्याचा जीव वाचवला की त्याला भूतदया म्हणावं. ज्याप्रमाणे माणसांना भावना असतात, त्याचप्रमाणे प्राण्यांना सुद्धा भावना असतात. त्यांना बोलता येत नसल तरी ते आपलं प्रेम व्यक्त करत असतात, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला पुन्हा पुन्हा पाहत राहावं असं वाटतं.

माणूस आणि वन्यप्राणी किंवा पाळीव प्राण्यांमधील प्रेमळ नात्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तसा फारच जुना आहे. पण यातल्या भावना मात्र तुमच्या मनाला भावणाऱ्या आहेत. हा व्हायरल व्हिडीओ तामिळनाडूमधला आहे. तामिळनाडूमधल्या एका वन अधिकाऱ्याने जखमी झालेल्या एका हत्तीच्या पिल्लाला वाचवलं आणि त्याच्या आईकडे सोपवलं. एका चिमुकल्या हत्तीच्या पिल्लाला आईची माया मिळाली. हे पाहून हत्तीच्या पिल्लाला सुद्धा कंठ फुटला आणि त्याने वन अधिकाऱ्याला प्रेमाने मिठी मारली. हत्तीच्या पिल्लाला त्याच्या आईकडे सोपवताना या वन अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसून येत होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन अधिकारी सुधा रमेन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या क्षणाचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हत्तीच्या पिल्लाने माणसाला मिठी मारलेली पाहून नेटिझन्स सुद्धा खूपच भावूक होताना दिसून येत आहेत. या फोटोवर कमेंट्स सेक्शनमध्ये नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. हा फोटो जवळपास १, १४० लोकांनी रीट्वीट केलाय. तसंच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हजारो लोकांनी लाइक्स दिले आहेत.