मध्य प्रदेशमधल्या एक रेल्वे रुळावर अत्यंत हृद्यद्रावक दृश्य पाहायला मिळालं. आपल्या मृत आईला बिलगून एक चिमुकला दूध पीत होता. आपली आई हे जग सोडून केव्हाच निघून गेलीये हे त्या चिमुकल्याला ठाऊकही नव्हतं. हे दृश्य पाहून कोणाचंही काळीज पिळवटून निघालं असतं. बुधवारी मध्य प्रदेश पोलिसांना रेल्वे रुळावर एक महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी जेव्हा पोलीस त्याठिकाणी पोहोचले तेव्हा समोर असेललं दृश्य पाहून त्यांच्याही काळजात चर्रर झालं. भूकेने व्याकुळ झालेलं एवढंस पोर आपल्या मृत आईला बिलगून तिचे दूध पित होता. हे दृश्य पाहून पोलिसांनाही आपले अश्रू अनावर झाले.

वाचा : ४८ तास सहजीवनाचे!

वाचा : राँग नंबरमुळे जुळल्या रेशीमगाठी!

या महिलेची ओळख पोलिसांना पटू शकली नाही. पण पोलिसांच्या माहितीनुसार ट्रेनमधून पडून या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. यात मुलं मात्र जिंवत राहिलं. बराच वेळ त्यांच्या मदतीला कोणी आलं नाही. पोलिसांनी काळजावर दगड ठेवून आईला बिलगून रडणाऱ्या या चिमुकल्याला वेगळं केलं. या मुलाला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले असून, पोलीस आता या महिलेच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.