scorecardresearch

खाकी वर्दीचा धाक दाखवून आधी पॅंट साफ करायला लावली, मग कानशिलात मारली…लेडी कॉन्स्टेबलचा हा VIDEO VIRAL

पोलीस हे सामान्यांच्या रक्षणासाठी काम करतात. मात्र सोशल मीडियावर एक लेडी कॉन्स्टेबलच्या ताईगिरीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

खाकी वर्दीचा धाक दाखवून आधी पॅंट साफ करायला लावली, मग कानशिलात मारली…लेडी कॉन्स्टेबलचा हा VIDEO VIRAL
(Photo: Twitter/ Anurag_Dwary)

पोलीस हे सामान्यांच्या रक्षणासाठी काम करतात. सध्याच्या करोना महामारीच्या काळाच तर जीवाची परवा न करता ते दिवसरात्र जनतेच्या सेवेत असल्याचे आपण पाहातो. मात्र सोशल मीडियावर एक लेडी कॉन्स्टेबलच्या ताईगिरीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये लेडी कॉन्स्टेबलने खाकी वर्दीचा धाक दाखवून एका व्यक्तीला आधी पॅंट साफ करायला लावली. हा प्रकार इथंच संपत नाही. तर पॅंट साफ करून झाल्यानंतर या लेडी कॉन्स्टेबलने त्याच्या कानशिलात देखील मारली. हा व्हिडीओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मध्य प्रदेश मधला आहे. अम्हिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरमौर चौकात ही घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय, की लेडी कॉन्स्टेबल एका व्यक्तीकडून पॅंट साफ करून घेत आहे. हा व्यक्ती बाईक हटवत असताना बाजुला असलेल्या या लेडी कॉन्स्टेबलच्या पॅंटला चिखल लागला होता. याचा या लेडी कॉन्स्टेबलला राग आला आणि त्या व्यक्तीला भररस्त्यात तिची पॅंट साफ करायला लावली.

आणखी वाचा : खाकी वर्दीतला ‘बाप’माणूस! लेकीकडून मेकअप करवून घेताना IPS पित्याचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जेव्हा वाघाच्या पिल्लाने आईला मिठी मारली…, हा VIRAL VIDEO जिंकतोय लाखो लोकांची मनं

ती एक महिला पोलीस अधिकारी आहे म्हणून तिला घाबरून व्हिडीओमधल्या व्यक्तीने तिची पॅंट साफ करून देखील दिली. मात्र या लेडी कॉन्स्टेबलचा प्रताप इथवरंच थांबला नाही. या व्यक्तीकडून पॅंट साफ करून घेतल्यानंतर तिने त्या व्यक्तीच्या कानशिलात देखील मारली. ही घटना आजुबाजूने जाणाऱ्या लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आणि आता तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल देखील होऊ लागलाय. पॅन्ट साफ करताना तरुणाला चापट मारणारी ही लेडी कॉन्स्टेबल दुसरी तिसरी कोणी नसून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेत तैनात होमगार्डच्या हवालदार असल्याचं सांगण्यात येतंय. या लेडी कॉन्स्टेबलचं नाव शशीकला दीक्षित असल्याचं कळतंय.

आणखी वाचा : हॉटेलमध्ये तंदुरी रोटी खाण्यापूर्वी हा VIRAL VIDEO एकदा पाहा, कॅमेऱ्यात कैद झालं हे किळसवाणं कृत्य

या संपूर्ण घटनेवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवकुमार यांचेही वक्तव्य आलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही व्हिडीओ पाहिला आहे… आणि असं दिसतंय की एका व्यक्तीला लेडी कॉन्स्टेबलची पॅंट साफ करण्यास भाग पाडलं गेलं. त्या याला कानशिलात देखील मारतात आणि तेथून निघून जातात. जर कोणी आमच्याकडे तक्रार घेऊन आलं तर आम्ही यावर कारवाई करू.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2022 at 19:23 IST

संबंधित बातम्या