अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख गोंधळलेले विद्यार्थी असा केला आहे. "राहुल गांधी एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे वाटतात, ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून आपल्या शिक्षकांना प्रभावित करण्यासाठीही तयार आहे. मात्र कुठेतरी त्या विषयामध्ये प्राविण्य मिळवण्याची योग्यता तसेच चमक या विद्यार्थ्यामध्ये दिसत नाही," असं ओबामा राहुल यांच्याबद्दल बोलले आहेत. 'न्यूयॉर्क टाईम्स'ने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्रासंदर्भात एक लेख लिहीला असून त्यामध्येच यासंदर्भातील उल्लेख आहे. बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रा जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. मात्र राहुल गांधी यांच्यासंदर्भातील उल्लेखाची सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा असून ओबामा यांनी राहुल यांच्याबद्दल असे शब्द कसे वापरले असा प्रश्न भारतीय नेटकऱ्यांनी विचारला आहे. याचसंदर्भात आक्षेप नोंदवताना नेटकऱ्यांनी ओबामांनी माफी मागावी असंही म्हटलं आहे. #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होत आहे. अनेकांनी ओबामा यांनी राहुल गांधींचा जो उल्लेख केला आहे त्यावरुन राहुल यांना ट्रोल केलं आहे. तर अनेक काँग्रेस समर्थकांनी राहुल यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर आक्षेप घेत ओबामा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे टीका करणारे आणि राहुल यांना ट्रोल करणारे दोन्ही बाजूचे नेटकरी यासंदर्भात ट्विट करताना #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग वापरत असल्याने हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग आहे. पाहुयात याच हॅशटॅगवरील काही ट्विट. जळतात माझ्यावर #माफ़ी_माँग_ओबामा Rahul Gandhi jee after reading Obama's thoughts about himself. pic.twitter.com/s2j2KgsmZ2 — कपिल गुर्जर (@kpnagar49) November 13, 2020 इथे तरी एकत्र आहेत #माफ़ी_माँग_ओबामा is trending. BJP supporters are tweeting too. Good to see such kind of unity among Indians. — Rahul Roushan (@rahulroushan) November 13, 2020 ओबामा स्वत:ला समजतात काय? We Indian condemn this language used by @BarackObama for @RahulGandhi ji. Who does Obama think he is??? Does he know more than @SalmanNizami_, @SaketGokhale, & @sanjukta ?? How dare that American undervalue our Prince Charming ?? #माफ़ी_माँग_ओबामा pic.twitter.com/Ayk7W26pON — Nishchal Mallya (@MallyaTweets) November 13, 2020 भाजपाच्या समर्थकांनी ट्रेण्ड केला म्हणे BJP supporters are trending #माफ़ी_माँग_ओबामा Becuase Rahul Gandhi is important for BJP than Congress! Such a selfless star — Original Sanghi (@True_sanghi) November 13, 2020 असा कसा अपमान केला #माफ़ी_माँग_ओबामा Me and my boys going to find who has insulted our comedy star pic.twitter.com/luPgVglO63 — Nagraj (@Nagraj72709858) November 12, 2020 अमेरिकन म्हणत असतील #माफ़ी_माँग_ओबामा *Indian Twitteratis asking Obama to apologise *Meanwhile Americans: pic.twitter.com/ReoPmVs6Wy — bakLoL Baby Penguin (@nikallovedayy) November 12, 2020 हा आमचा अंतर्गत विषय Dis is our internal matter..please stop dis mudslinging.@BarackObama#माफ़ी_माँग_ओबामा pic.twitter.com/FYB0F7dygW — Ranjit Rathore (@Ranjit57800725) November 12, 2020 त्यामुळे ओबामा असं म्हणाले Looks like Obama was getting pissed off with Rahul Gandhi using his and his family's name to canvass votes in the 2017 UP assembly elections. Badla le liya usne. But still, #माफ़ी_माँग_ओबामा — Rahul Roushan (@rahulroushan) November 13, 2020 अन् फॉलो करा Asking all Indians to unfollow @BarackObama for his comments on Rahul Gandhi unless he apologizes. #माफ़ी_माँग_ओबामा pic.twitter.com/2QvxxQnCuK — Ajay kumar 10k (@ajaykr_19) November 13, 2020 अरे आम्ही. #माफ़ी_माँग_ओबामा BJP's reaction after reading about his star campaigner RaGa in Obama's book. pic.twitter.com/w3ZcU6Mnbi — Lal-Darpan (@Royalist_sujit) November 13, 2020 दरम्यान, आपल्या पुस्तकात बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही उल्लेख केला आहे. “आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रहम एमॅन्युअल यांसारखे पुरूष हँडसम असल्याचं सांगितलं जातं परंतु महिलांच्या सौंदर्याबद्दल सांगितलं जात नाही. यासाठी एक किंवा दोन उदाहरणंच अपवाद आहेत जसं की सोनिया गांधी,” असंही ओबामा सोनियांबद्दल बोलताना म्हणालेत. “भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स यांच्यात एक खरेपणा आणि प्रामाणिकपणा आहे,” असंही ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे. ओबामा यांचं हे पुस्तक १७ नोव्हेंबर रोजी बाजारात उपलब्ध होणार आहे. बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात २०१० आणि २०१५ मध्ये भारताचा दौरा केला होता.