Trimbakeshwar Jyotirling Mandir in Nashik : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. ब्रम्हदेवांनी इथे एका पर्वतावर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तप केले होते, असं मानलं जातं. इथल्या शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. अगदी दूरवरून लोक इथे दर्शनासाठी येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरू लागली आहे. याचा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आलाय. खुद्द मंदिर पुजाऱ्यांनी या घटनेबाबत महिती दिली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटना समोर आली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शंकराच्या पिंडीच्या मधोमध बर्फाचा गोलाकार गोळा जमा झालेला दिसत आहे. पिंडीवर बर्फ जमा होणे ही पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे. पिंडीच्या मधोमध एक फूट खड्डा आहे. यात सातत्याने गोदावरी नदीचे उगमाचे पाणी पडत असते. त्याचबरोबर भाविकांनी वाहिलेले दूध, किंवा इतर दिवशी केलेला अभिषेक यामुळे सातत्याने पडणाऱ्या पाण्यामुळे ते कायम भरलेले असते. त्यात गारवा निर्माण होऊन बर्फाचे गोळे तयार झाले असावेत, असं सांगण्यात येतंय. वातावरणातील तापमानाची घट हे त्यामागील प्रमुख कारण असल्याची माहिती नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेला कोणताही दैवी चमत्कार किंवा चांगले-वाईट घडण्याचे दैवी संकेत समजू नये, असं आवाहन देखील करण्यात येतंय.

आणखी वाचा : ‘सुपरफास्ट’ तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बाबो! असलं वादळ पाहून अंगावर काटा येईल, कॅनडातल्या चक्रीवादळाचा VIDEO VIRAL

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसत आहे. त्यामुळे कुणीही लोकांनी अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये, असं सांगण्यात येतंय. तसेच संबंधित पोलीस प्रशासनानेही याची तातडीने दखल घेऊन, अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे अंनिसच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

आणखी वाचा : चिमुकल्याची ही जादू पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल, पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी भारत-चीन युद्धादरम्यान असाच बर्फाचा थर इथे जमा झाला होता. असा बर्फ 1962 मध्ये जमा झाल्याचे सांगितले जाते. ईशान्य भारतातील संकटानंतर हा चमत्कार घडल्याचे बोलले जात आहे. ईशान्य भारतातील आसाम बुडल्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर अशाच पद्धतीने बर्फ जमा झाला होता.