Viral video: परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना भारतीय पदार्थ मिळण्याची नेहमीच वानवा असते. काही पदार्थ असे असतात की आपल्या देशाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण अशा खवय्यांसाठी एक खास खबर..आता अगदी सातसमुद्रापार साहेबांच्या देशात, इंग्लंडमध्येमध्येही चाखता येणार आहे भारतीय चव आणि तेही आपल्या खास मराठमोळ्या हॉटेलमध्ये. इंग्लंडमध्ये एका भारतीयानं हॉटेल भाजीपाल या नावाने एक हॉटेल सुरु केलं आहे. या हॉटेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ एका भारतीय तरुणानं बनवला आहे, इंग्लंडमध्ये भारतीय संस्कृतीचं हॉटेल पाहून त्यालाही प्रचंड आनंद झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हॉटेलचं नाव हे हॉटेल भाजी-पाला असं देण्यात आलं आहे. तसा मोठा बोर्डही त्यांनी लावला आहे. आतमध्येच जाता हॉटेलमधलं इंटीरियर पाहून असे वाटेल महाराष्ट्रातील एखाद्या हॉटेलमध्ये आलोय. छान हिंदी गाणी ऐकू येत आहेत, तसेच आतमध्ये शेतातल्या शेतकऱ्यांचे फोटो लावले आहे. जेवणासाठी भांडींही तांब्याची देण्यात येत आहे.तसेच अस्सल मराठमोळी थाळी या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये महाराष्ट्रीयन जेवण, पाणीपुरी असे पदार्थ दिसत आहेत. या रेस्टोरंटमुळे इंग्लंडमध्येमधील खवय्यांची भारतीय पदार्थ चाखण्याची गैरसोय दूर झाली आहेच पण परदेशी खवय्येही ही या रेस्टॉरंटकडे वळत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> जैसे ज्याचे कर्म तैसे…‘शत्रू’चे घर जाळायला गेला…पण स्वतःच आगीत होरपळला, पाहा VIDEO
@sanjayzsnehal या इंस्टाग्राम अकांऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरीही हे पाहून खूश झाले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.