२०१७ वर्ष संपून नुकतेच नवीन वर्ष सुरु झाले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण मागी लवर्षात घडलेल्या गोष्टींचा आढाव घेतो आणि पुढील वर्षात साध्य करण्याच्या गोष्टींचीही यादी करतो. पण काही लोकांचे गतवर्ष हे अधिक प्रेरणादायी असते. नोबेल विजेती मलाला युसूफझाई हीचे गतवर्ष अशाचप्रकारे अतिशय चांगले होते आणि तिने मागील वर्षात घडलेल्या चांगल्या गोष्टींचा आढावा घेतला आहे. मलालाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. तिने वर्षभरात केलेली ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

महिला शिक्षणासाठी लढा देणारी ही लहानगी मुलगी दहशतवादाचा सामना करत इतक्या खंबीरपणे उभी राहते हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. तिने केलेल्या पोस्टमुळे अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचेच चित्र आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची शांतीदूत, कॅनडाचे नागरिकत्व, परीक्षेमध्ये अ श्रेणी, ट्विटरवर प्रवेश यांसारखे अनेक यशस्वी टप्पे तिने गाठले आहेत. शिक्षणाचे महत्त्व आणि महिलांचा त्यातील सहभाग या गोष्टींवर आधारीत तिने मलालाज मॅजिक पेन्सिल हे आपले दुसरे पुस्तकही याच वर्षात लिहून पूर्ण केले आहे. तिने मागील वर्षात परदेशात दिलेल्या भेटींचे फोटोही तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये मॅक्सिको, नायजेरीया या देशांमधील तिच्याप्रमाणे शिक्षणासाठी लढणाऱ्या मंहिलांसोबतचे फोटो तिने शेअर केले आहेत. गरिबी, बालविवाह, शिक्षणासाठीचा लढा देणाऱ्या या मुलींना भेटणे ही अतिशय आनंदाची गोष्ट होती असे मलालाने म्हटले आहे.

https://twitter.com/Mr_Crichton/status/947554269506428929

मागील वर्षाचा आढावा घेत असतानाच तिने आपण नवीन वर्षासाठीही प्रेरणादायी मेसेज दिला आहे. यामध्ये ती म्हणते, मुलींनो जगासाठी काम करत राहा, यातच तुम्हाला तुमचे भविष्य सापडेल. तिच्या या पोस्ट सोशल मीडियावर अगदी कमी वेळात व्हायरल झाल्या असून त्याला अनेकांनी लाईक आणि रिट्विट केले आहे. तर अनेकांनी आपल्याला मलालाच्या या पोस्टमुळे खूप प्रेरणा मिळाली असल्याचे म्हटले आहे.