सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही स्टंट फसलेले दिसतात तर काही थक्क करून जातात. असाच एक आश्चर्यचकित करणारा स्टंट आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आतापर्यंत तुम्ही सायकल, बाईक किंवा कारवर केले जाणारे स्टंट पाहिले असतील. पण या व्यक्तीनं तर चक्क ट्रॅक्टरसमोर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि जिवानीशी गेला. याचा हादरवून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तो स्टंट ठरला जीवघेणा

हा व्हिडीओ पंजाबधील गुरदासपूरचा असल्याचं समोर आलं आहे. याठिकाणी सुखमनदीपसिंग यांनी स्टंटबाजी करताना आपला जीव गमावला आहे. ग्रामीण खेळ असतात कुस्ती, मल्लखांब त्याचप्रमाणे ग्रामीण खेळ मेळाव्यात सुखमनदीपसिंग धोकादायक स्टंट करत होते. यावेळी ट्रॅक्टरने चिरडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

स्टंट करताना पाय अडकला अन्

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुखमनदीपसिंगसोबतच आणखी दोन व्यक्ती चालत्या ट्रॅक्टरसमोर मस्ती, स्टंटबाजी करत आहेत. ट्रॅक्टर ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने जात हे लोक मागे पुढे करत आहेत. याचवेळी सुखमनदीपसिंग याचा पाय सरकतो आणि ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली येतात. त्यांच्या संपूर्ण शरिरावरून दोनवेळा ट्रॅक्टर जातो. आजूबाजूला असणारे मदतीला धावतात मात्र ते काहीच करु शकत नाही. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, थोड्यावेळाने २९ वर्षी सुखमनदीपसिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> प्रेमानं जग जिंकता येतं! गायीनं केलं किंग कोब्राला किस; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

गुरुदासपूरचे उपायुक्त हिमांशू अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फतेहगढ चुरिया येथे एका खाजगी कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. “पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. हा स्टंट करण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. मी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना आयोजकांवर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. आम्ही अशा कार्यक्रमांना परवानगी देतो परंतु योग्य परवानगी आणि सुरक्षेचे पालन केल्यानंतरच,” असं अग्रवाल म्हणाले.

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. याची अनेक उदाहरणे रोज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये पहायला मिळतातच. मात्र हे कधीकधी जिवावर बेतू शकतं याचा विचार करत नाही.