प्रेम हे अंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात लोक काहीही करु शकतात. मेक्सिकोमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी स्वत:ची किडनी त्यांना दिली. मात्र त्यानंतर एका महिन्याने या तरुणीने आपल्या प्रियकराऐवजी दुसऱ्याच व्यक्तीसोबत संसार थाटला.

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार मॅक्सिकोमधील बाजा कॅलिफॉर्निया येथे शिक्षण घेत असणाऱ्या उजिएल मार्टिनेज नावाच्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टिकटॉकवरील व्हिडीओमध्ये मार्टिनेज त्याच्या प्रेयसीबद्दल बोलताना दिसतोय. माझं माझ्या प्रेयसीवर फार प्रेम होतं. त्यामुळेच मी माझी एक किडनी तिच्या आईला दान केली, असं मार्टिनेज व्हिडीओमध्ये सांगतोय. तसेच पुढे बोलताना तो म्हणतो, “मात्र शस्त्रक्रीया झाल्यानंतर महिन्याभरातच तिने माझ्याशी ब्रेकअप केलं आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं.”

मार्टिनेज टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो सोफ्यावर पडून हा सारा घटनाक्रम सांगताना दिसतोय. या व्हिडीओला १६ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मार्टिनेजने व्हिडीओत केलेल्या दाव्याप्रमाणे त्याच्या प्रेयसीच्या आईची प्रकृती फारच चिंताजनक होती. त्यांची एक किडनी निकामी झाली होती त्यामुळे त्यांना तातडीने किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रीया करणं आवश्यक होतं. त्यावेळी मार्टिनेज त्याच्या प्रेयसीच्या आईला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

नक्की पाहा >> एक झडप अन् टप्प्यात कार्यक्रम…; ९४ लाख Views असणारा सिंहिणींच्या ‘टीम वर्क’चा हा Video पाहिलात का?

मार्टिनेज किडनी दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करत किडनी दानही केली. प्रेयसीच्या आईवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ती ठणठणीत बरीही झाली. मात्र आपण केलेल्या या मदतीच्या बदल्यात आपली प्रेयसी आपलीच फसवणूक करेल असं मार्टिनेजला वाटलं नव्हतं. मात्र झालं तेच.

नक्की वाचा >> शिकारीचा ‘हा’ ५७ सेकंदांचा Video पाहून आव्हाडही झाले थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “Amazing Hunting”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आईच्या शस्त्रक्रीयेनंतर महिन्याभराने या तरुणीने मार्टिनेजसोबत ब्रेकअप केलं आणि दुसऱ्याशी लग्न केलं. मार्टिनेज व्हिडीओत हा प्रकार सांगितल्यानंतर अनेकांनी कमेंट करुन आपल्या भावना व्यक केल्यात. काहींनी एवढा मोठा त्याग तू केलायस, हे फार कौतुकास्पद आहे, असं म्हणत मार्टिनेजचं कौतुक केलंय.