scorecardresearch

Viral Video: पठ्ठ्या चक्क स्कुटीलाच हवेत उडवायला गेला अन् दणकण जमिनीवर आपटला, नेटकरी म्हणाले, “अजून हिरोगीरी कर”

स्कुटीवर खतरनाक स्टंटबाजी करून हिरोगीरी करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली, पाहा भन्नाट व्हिडीओ.

Viral Video: पठ्ठ्या चक्क स्कुटीलाच हवेत उडवायला गेला अन् दणकण जमिनीवर आपटला, नेटकरी म्हणाले, “अजून हिरोगीरी कर”
स्कुटीवर स्टंट मारयाला गेलेला तरुण तोंडावरच आपटला. (Image-Instagram)

Bike Stunt Accident Viral Video : बाईकवर स्टंटबाजी करुन हिरोगीरी करणाऱ्या तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे अनेकदा पाहिले असतील. पण बाईकवर धोकादायक स्टंटबाजी करणं काही तरुणांच्या अंगलटही आल्याचे काही व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालेत. असाच एक भन्नाट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून स्कुटीवर स्टंट मारताना एका तरुणाची चांगलीच फजीती झाल्याचं समोर आलं आहे. स्पोर्ट्स बाईकवर स्टॉपी, व्हिली सारखे स्टंट मारुन त्याचे रील्स आणि व्हिडीओ बनवण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण स्टंटबाजीच्या अशा वेडेपणामुळं रस्त्यावर अपघाताला सामोरं जावं लागतं, याचा विचारही काही जण करत नसतील.

स्कुटीवर खतरनाक स्टंट मारायला गेला आणि तोंडावरच आपटला

एक तरुण स्कुटीवर खतरनाक स्टंट मारायला गेला आणि रस्त्यावर तोंडावरच आपटल्याचं या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. सुरुवातीला स्कुटी रस्त्यावर चालवत असताना विली स्टंट मारण्याचा प्रयत्न करताना तो मुलगा दिसत आहे. पण काही क्षणानंतर त्याचा तोल जातो आणि तो जमिनीवर पडतो. हा संपूर्ण हास्यास्पद थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. @arshlaan_99 नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत या व्हिडीओला ३.३ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसेच हा थतरनाक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

नक्की वाचा – Video: मुंबई मेट्रो ट्रेनच्या दरवाज्यात अडकला तरुणीचा ड्रेस, ट्रेन सुरु होताच प्लॅटफॉर्मवर फरफटत गेली तरुणी, क्षणातच घडलं असं काही…

इथे पाहा व्हिडीओ

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, भाऊ प्रयत्न करत राहा, एक दिवस तू पास होशील, हिंम्मत हारू नको. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, भाऊ, काहीही करण्याचा आधी आपल्या आई-वडीलांचा विचार नक्की करायचा.” तर अन्य एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत या तरुणाची खिल्ली उडवली. तो म्हणाला, अजून हिरोगीरी कर”. बाईकवर स्टंटबाजी करून स्वत:चा जीव धोक्यात टाकताना अनेक तरुण मुलं रस्त्यावर दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लाखमोलाच्या जीवाला कवडीमोल करण्याचा जणू काही कंत्राटच काही तरुणांनी घेतलाय की काय? असा सवाल व्हायरल झालेले पाहिलेले व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी नेहमी उपस्थित करतात. पण स्टंटबाजी करण्याचं या तरुणांना व्यसनच लागल्याचं दिवसेंदिवस व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 15:39 IST

संबंधित बातम्या