दिवाळी आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. तुमच्याही घरात दिवाळीची तयारी सुरु झाली असेल, फराळ, शॉपिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साफ-सफाई. दिवाळी म्हंटलं की आधी साफ-सफाई आलीच. मग त्यात रंगकामही. दिवाळी बहुतेक सगळ्यांच्याच घरी रंगकाम केलं जातं. मात्र यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल मध्येच काळजी घ्यायला का सांगताय. तर त्याचं झालं असं की एक व्यक्ती असंच घराचं रंगकाम करण्यासाठी शिडीवर चढला होता,मात्र तोल जाऊन त्याचा मोठा अपघात झाला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घराला बाहेरच्या बाजुला रंग देण्यासाठी एका शिडीनप व्यक्ती उभा आहे. खाली आणखी एक व्यक्ती शिडीला पकडून उभा आहे. सगळं नीट सुरु असताना अचानक खालचा व्यक्ती शिडी दुसऱ्या बाजूला हलवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच गडबड होते. शिडीवर उभा असलेला व्यक्ती तोल न सांभाळता आल्यामुळे आणि शिडी पडल्यामुळे खाली पडतो.

तो इतक्या जोरात पडतो की त्याला पुन्हा उठताही येत नाहीये. हा असा अचानक अपघात कोणाबरोबरही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही जर दिवाळीनिमित्त तुम्हीही घराला रंग देणार असाल तर काळजी घ्या.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लहान मुलं जी बॉबी आवडीनं खातात; ती फॅक्टरीमध्ये अशी तयार केली जाते, VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @CctvPicks या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.