Mcdonalds Viral News : मॅक्डोनल्डमध्ये बर्गर, फ्रेंच फ्राईज, नगेट्स, सॉफ्ट ड्रिंक्स इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी असते. कुणी कुंटुंबीयांसोबत तर कुणी मित्रांसोबत मॅक्डोनल्डमध्ये जाऊन अशाप्रकारच्या चविष्ट खाद्यपदार्थांवर ताव मारतात. जंक फूड आरोग्यासाठी फायदेशीर नसतानाही काही माणसांना मॅक्डोनल्डमध्ये असलेले हे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. अमेरिकेच्या एका तरुणाला त्याच्या ड्राईव्ह थ्रू ऑर्डरसोबत ४. ६ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली. ही फूड ऑर्डर मिळाल्यानंतर त्या तरुणाला आपण लखपती झालो आहोत की काय? असंच काहिसं वाटलं होतं. पण त्यानंतर तरुणाने जे केलं त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. तरुणाने संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन दाखवल्याने मॅक्डोनल्ड आउटलेटमध्ये त्या तरुणाला एक जबरदस्त हॅपी मीलही देण्यात आलं. मॅक्डोनल्डमधून या तरुणाला देण्यात आलेल्या सॉसेज आणि मॅकमफिनच्या ऑर्डरसोबत एका बॅगमध्ये ही रक्कम देण्यात आली होती. या संपूर्ण घटनेबाबत जोशियाने टिकटॉकवर एक पोस्ट शेअर केली आणि घडलेला सर्व प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना सांगितला.
चार लाखांची रोख रक्कम मिळाल्यानंतर तरुणाने असं काही केलं….तुम्हालाही विश्वास बसणार नाही
जोशियाचा टिकटॉक व्हिडीओ तुफान गाजला असून १३ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. जोशियाने सांगितलं की, त्याला मॅक्डोनल्डकडून एका बॅगेसोबत सॉसेज मॅकमफिनही दिलं होतं. त्याने त्याच्या कारमधून व्हिडीओ बनवून त्याला मिळालेल्या बक्षिसांबाबत माहिती दिली. त्याने म्हटलं, मी मॅक्डोनल्डमध्ये गेलो आणि त्यांनी मला सॉसेज मॅकमफिन आणि ही बॅग दिली. बॅग उघडल्यानंतर पाहिलं तर त्यात पैशांचे बंडल होते. हे पाहून मला धक्काच बसला. ते असं का करतील? असा प्रश्न मला पडला. त्यानंतर मी कॅमेरासमोर पैशांचे बंडल दाखवले.
आऊटलेटने दिलेल्या माहितीनुसार, त्या तरुणाने टिकटॉकवर म्हटलं, आता मला हे परत करावे लागणार. कारण मी एक चांगला व्यक्ती आहे, असं मला वाटतं. त्यानंतर तो पुन्हा मॅक्डोनल्डमध्ये गेला आणि रोख रक्कम परत केली. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, मॅक्डोनल्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आनंद झाला. कारण त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले. पैसे पुन्हा परत मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एका कर्मचाऱ्याने म्हटलं, जोशियाला गळाभेट देऊन त्याचे आभार व्यक्त करुन एक फोटोही घ्यायला आवडलं. टिकटिक व्हिडीओवर जोशियाने म्हटलं, ते सर्व कर्मचारी गळाभेट करत माझ्यासाठी आभार व्यक्त करत होते.