युद्धाच्या एका जुन्या टँकमध्ये कोटींचे सोने मिळालेलं ऐकलंत कधी? आता युद्धाचे रनगाडे, टँक ते.. तिथे काय मिळेल? फार फार तर बंदूका किंवा गोळाबारुद. हिच आशा घेऊन लंडनमधल्या निक मेड नावाच्या व्यक्तीने एक जुना इराकी टँक खरेदी केला. हा टँक खरेदी केल्यानंतर तो आणि त्याचा सहकारी टॉड दोघेही या टँकच्या इंधन टाकीत डोकावून पाहत होत. आतापर्यंत त्यांनी असे युद्धातले अनेक टँक खरेदी केले होते यात त्यांना दारूगोळा किंवा बंदुका मिळायच्या. याच आशेने ते इंधन टाकीत शोध घेत होते पण काही वेळातच बंदुकांपेक्षाही जास्त किमतीचे घबाड त्यांना हाती लागेल. या टँकमध्ये जवळपास १५ कोटींहूनही अधिक किंमतीची सोन्याची पाच बिस्किटे त्यांच्या हाती लागली . निकने २४ लाखांना हा टँक विकत घेतला होता, पण याच टँकमधून आपल्याला १५ कोटींचे सोने मिळेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल.

आखाती युद्धाच्या दरम्यान या सोन्याची तस्करी केली गेली त्यापैकीच ही सोन्याची बिस्किटं असल्याचे समजत आहे. १९९० मध्ये इराणी सैन्याने कुवेतवर हल्ला केला होता. त्यावेळी इराकी सैन्याने सोनं लुटलं होतं. आखाती युद्ध संपल्यानंतर इराकने लुटलेली ३ हजारांहूनही अधिक सोन्याची बिस्किटे कुवेतला परत केली होती. त्यापैकीच काही सोन्याची बिस्किटे ही टँकमध्ये लपवली असावीत. निक आणि टॉड या दोघांनाही याचा खूपच आनंद झाला पण या दोन इमानदार व्यक्तींनी हे सोने आपल्याकडे न ठेवता ते सोने पोलिसांच्या ताब्यात दिले.