आजकाल आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी वेगवेगळ्या मॅट्रीमोनिअल साईट्सची मदत घेतली जाते, तर डेटिंगसाठी डेटिंग अ‍ॅप्सची मदत घेतली जाते. डेटिंग अ‍ॅपवर आपल्याला अनुरूप अशा जोडीदाराचा शोध घेतला जातो. पण हा शोध घेताना कधी कोणाला नोकरी मिळाली आहे, असं कधी ऐकलंय का? आपण कोणीही असा योगायोग यापूर्वी कधी ऐकला नसेल. पण सध्या व्हायरल होणाऱ्या ट्वीटमधून असाच अचंबित करणारा योगायोग घडल्याचे समोर आले आहे.

एका व्यक्तीला बंबल अ‍ॅपवर चॅट करताना चक्क नोकरी मिळाल्याचे ट्वीट त्याने स्वतः केले आहे. या व्यक्तीचे नाव अदनान खान असुन, त्याने ट्वीट करत नेमके काय घडले ते सांगितले आहे. अदनान बंबल अ‍ॅपवर चॅट करत असताना त्याची ओळख ह्यूमन रीसोर्स (एचआर) डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीशी झाली. चॅट करताना ही तरुणी कोणते काम करते हे तिने सांगितले त्यावर अदनानने तुम्ही मलाही संधी देऊ शकता अशी विचारणा केल्यावर, तरुणीने ती सुद्धा ‘कोणत्या प्रकारचे काम शोधत आहात’ हेच विचारणार असल्याचे सांगितले. नंतर नोकरीबाबतच्या गप्पा सुरू झाल्या. अशाप्रकारे या तरुणाला जोडीदाराचा शोध घेताना थेट नोकरीची संधी मिळाली. पाहा व्हायरल ट्वीट.

Lost intellectually-challenged boy reunited with parents via QR code on pendant
खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडेंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध
actress mumtaz owned car 1934 rolls royce is back with gaekwads
अभिनेत्री मुमताज यांची 1934 Rolls Royce कार ‘या’ राजघराण्याने पुन्हा घेतली विकत
pune sex racket marathi news, hinjewadi sex racket
पुणे: आयटी हब हिंजवडीत फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

आणखी वाचा: दारू पिऊन मुंबईकर तरुणीने बंगळूरमधून बिर्याणी केली ऑर्डर; झोमॅटोचं बिल पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हायरल ट्वीट:

आणखी वाचा: काळ आला होता पण…; व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले ‘यासाठी कृतज्ञता…’

या ट्वीटनंतर अदनानने आणखी एक ट्वीट करुन त्याला ही नोकरी मिळाल्याची माहिती दिली आहे. हा अचंबित करणारा योगायोग पाहून नेटकरीही आनंदी झाले असुन, ‘सध्या देशात बेरोजगारी इतकी वाढत आहे की कोणतेही अ‍ॅप जॉब हायरिंग बनु शकते’, ‘नोकरीचा शोध कुठेही सुरू होऊ शकतो’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. बंम्बल अ‍ॅपवरून थेट नोकरी मिळवणारे हे कदाचित पहिले उदाहरण असेल.