Viral video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. ‘काळ आला होता; पण वेळ आली नव्हती’ व ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणींचा प्रत्यय आलाय. कधी कधी अतिशय आश्चर्यकारक घटना घडत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या १५ साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि हा तरुण समुद्रात पडला. यानंतर तो जवळ जवळ ५ दिवस समुद्राच्या विशाल लाटांमध्ये स्वत: जीव वाचवण्यासाठी झगडत होता. यानंतर अखेर त्याच्या जिद्दीमुळे चमत्कारिकरित्या तो बचावला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्यक्तीचं नाव रवींद्रनाथ असून ४ जुलै रोजी त्याच्या जहाजावर १४ मच्छिमारांसह खोल समुद्रात गेला होता. रवींद्रनाथ यांचे जहाज उलटले तेव्हा २३ लोक त्याखाली अडकले तर दाससह ११ जणांनी पाण्यात उडी मारली आणि बांबूला धरून राहिले. पण गेल्या ५ दिवसांत, सर्वजण एक एक करून मरण पावले तर दास जिवंत राहिला. १० जुलै रोजी, जेव्हा एका बांगलादेशी जहाजाने दासला पाहिले, तेव्हा दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला वाचवण्यात आले.
चितगाव किनाऱ्यावर ५ दिवसांपासून अडचणीत अडकलेल्या या व्यक्तीला बांगलादेशी जहाजाने वाचवले आहे. रवींद्रनाथ दास नावाचा एक तरुण गेल्या ५ दिवसांपासून अन्न आणि पाण्याशिवाय बांबूच्या खांबाच्या मदतीने जगत होता. ६ जुलैपासून पावसात रवींद्रनाथ तिथे पाण्यात जगत होता. वादळात त्याचे जहाज समुद्रात बुडाले आणि तो एकटाच वाचला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कशाप्रकारे बोटीवरचे लोक या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर दोरी तो व्यक्ती हातात पकडतो आणि पुढच्याच क्षणी बोटीवरचे लोक त्याला बोटीत घेऊन येतात. क्रेनने त्याला वर खेचलं गेलं, थकलेला, अर्धमेला, पण जिवंत. जेव्हा तो जहाजावर चढला, तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले. त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही, तर माणुसकीला जिवंत पाहिलं.त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ram_phalke77 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर आता लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे.” तर आणखी एकानं, “कधी कधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा, संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते.”