पोलीस एखाद्या चोराच्या मागे लागल्यावर चोर सर्वात आधी काय करेल? तर लपण्यासाठी एखादी सुरक्षित जागा शोधेल. हो ना! चोर भारीच स्मार्ट असतात, पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अशा जागा शोधून काढतील की काही नेम नाही. मग जोपर्यंत प्रकरण निवळत नाही तोपर्यंत ते काही बाहेर येण्याचं नावही काढणार नाही. पण जगात काही मूर्ख चोर असतात जे आपल्या मुर्खपणामुळे ‘चोरांच्या प्रजाती’ची किर्ती अगदी दूरदूरपर्यंत पोहोचवण्यास ‘विशेष’ हातभार वगैरे लावत असतात.
वाचा : म्हणून तो १२ वर्षांचा मुलगा भरपावसातही बुजवतोय रस्त्यावरचे खड्डे
आता या चोरांचं घ्या ना, पोलीस याच्या मागावर आहे समजात लपण्यासाठी त्याने अशी भन्नाट जागा शोधून काढली की पोलिसांच्याही हसून हसून पोटात दुखू लागलं. पोलीस आपल्याला पकडायला आलेत म्हटल्यावर हा चोर चक्क पलंगाखाली लपला. आता आपण लहानपणीसारखं चोर पोलीस खेळ खेळतोय की काय असं बहुदा याला वाटलं असेल. पण पलंगाखाली लपण्याची या चोराची कल्पना पुरती फसली आणि एका फटक्यात तो पकडला गेला. West Yorkshire पोलिसांनी याचा फोटो फेसबुकवर शेअर केलाय. लपण्यासाठी अजब जागा शोधलेल्या या ‘बुद्धीमान’ चोराचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि नेटीझन्स त्याच्या या अफाट बुद्धीमत्तेची दाद देत आहेत.