सरकारी कामे अतिशय संथ गतीने होतात, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. सरकारी बँकेत किंवा इतर कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलात तरी इथल्या लोकांचं काम संथ गतीने बघून मन राग येतो. एखाद्या कागदपत्रावर नुसती स्वाक्षरी करायची असली तरी हे छोटंसं काम पूर्ण होण्यासाठी अनेक दिवस लागतात. अशातच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्या व्हिडीओमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने चक्क साप घेऊन कार्यालयात सोडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

राजधानी हैदराबादमध्ये एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका घरात साप घुसला होता, त्यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी न आल्याने संतापलेल्या व्यक्तीने थेट नगरपालिका कार्यालयात साप सोडल्याची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  त्याने जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र सहा तास उलटूनही कारवाई झाली नाही. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने साप स्वतःहून पकडून वॉर्ड ऑफिसमध्ये नेला आणि अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडला.

हैदराबादचे भाजपचे नेते विक्रम गौर यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओखाली त्यांनी लिहिले आहे की,अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तो व्यक्ती किती असहय्य झाला असेल की, त्याने चक्क अधिकाऱ्याच्या कार्यालयात साप सोडला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचाVIDEO: मुलाने वडिलांना दिले तब्बल ४ लाखांचे शूज; किंमत ऐकून वडिलांनी हातच जोडले, म्हणाले “आधी कमवा…”

२६ जुलै रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. तसेच नेटकरी देखील या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत