Trending News: नशिबाची साथ असेल तर माणसाला कोणीच हरवू शकत नाही म्हणतात. नशीब वैगरे काही नसतं रे मेहनत करशील तर सगळं होईल हे कितीही खरं असलं तरी काही वेळा एखाद्याच्या नशिबात काही गोष्टी लिहिलेल्या असतात ज्या टाळणे शक्यच होत नाही. आता याला अंधश्रद्धा म्हणायचं की अनुभ हे ज्याने त्याने ठरवावं. चला तुम्हाला ठरवण्यासाठी मदत म्हणून एक उदाहरण पाहुयात.. BMW या कंपनीने आपल्या एका कर्मचाऱ्याला कामावर असताना लंच ब्रेक घेतला म्हणून चक्क कामावरून काढून टाकलं पण या पठ्ठ्याचं नशीब इतकं जोरदार होतं की त्याने कामावरून काढून टाकल्यावरही कंपनीकडून तब्ब्ल १७ लाख रुपये मिळवले. नेमकं काय झालं तर…
२०१८ मध्ये ऑक्सफर्डमधील BMW फॅक्टरीत संध्याकाळच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या रायन पार्किन्सन याने बर्गर किंगमध्ये खायला जाण्यासाठी एक तासाचा ब्रेक घेतला होता, यावरून कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं होतं. हा अन्याय असल्याचे म्हणतात रायनने GI ग्रुप या एजन्सीवर खटला दाखल केला होता.
रायन म्हणाला, “माझे सहकारी कुठे खायला जायचं आहे याबद्दल बोलत होते. प्रत्येकाला कबाब हवा होता, आणि मी म्हणालो की मला बर्गर किंग हवा आहे,” मी गाडीत बसलो आणि बर्गर किंगला गेलो आणि साडेबारा वाजेपर्यंत बाहेर होतो. . यावरून मला कामावरून काढण्यात आले. हा खटला दाखल करताना कंपनीने आपल्याबाबत वर्णभेद केल्याचेही म्हंटले आहे. यानंतर सुनावणी घेऊन २०१९ मध्ये त्याला त्याची नोकरी पुन्हा देण्यात आली पण नंतर तीन महिन्यात पुन्हा एकदा खाण्यासाठी बाहेर जाताना त्याने अघोषित ब्रेक घेतल्याने त्याला कामावरून काढण्यात आले.
हे ही वाचा<< सुट्टीच्या दिवशी कॉल, मेसेज केला तर १ लाख दंड; भारतीय कंपनीचा ‘हा’ नियम तुमच्या ऑफिसमध्ये हवा ना?
दरम्यान, पुन्हा एकदा रायनने GI ग्रुपवर अन्यायकारक बडतर्फीसाठी दावा दाखल केला. याच खटल्यात त्याने चक्क £16,916 म्हणजेच सुमारे १७ लाख रूपये जिंकले आहेत. GI ग्रुप त्यांच्या ट्रेड युनियनच्या प्रतिनिधीच्या दाव्याची चौकशी करण्यात अयशस्वी ठरले होते, तसेच अशाप्रकारे अन्य कर्मचारी जेव्हा ब्रेक घेत होते तेव्हा कारवाई झाली नव्हती केवळ रायनच्या बाबत अशी कारवाई करण्यावरून त्याला भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले होते. याशिवाय साइटमधून बाहेर पडण्याची परवानगी मिळविण्याबाबत किंवा पर्यवेक्षकाला सूचित करण्यासाठी सूचना नमूद केले नसल्याने ही भरपाई देण्यात आली होती.