गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या नात्यामधील भांडण काही वेळेस ब्रेकअप पर्यंत पोहचतात. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतर ज्या परिस्थितीतून कपल जातात त्याचा अनुभव फार वाईट असतो असं नेहमी म्हटलं जातं. काही जण ब्रेकअप नंतर एवढे आतमधून तुटले जातात की त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो. काही कपल्सचं प्रेम हे लग्नापर्यंत पोहोचतं. पण कधीकधी काही गोष्टी आपल्याला हव्या तश्या होत नाहीत. बऱ्याच वेळा रिलेशनमध्ये दुरावा येतो आणि नातं ब्रेकअपमध्ये बदलतं. ब्रेकअपनंतर दोघांच्या नात्यात कटुता दिसू लागते. पण आज आम्ही तुम्हाला अशा गोड कपलची गोष्ट सांगत आहोत जिची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरूय.

युकेमधल्या वेल्समध्ये राहणारा टिकटॉक स्टार शॉन नीलँड याचं नुकतंच त्याच्या लॉन्ग टर्म गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालंय. नेमकं त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस आला. ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा टिकस्टार शॉन त्याच्या एक्स गर्लफ्रेंड कॅट कीननला भेटण्यासाठी गेला. या भेटीचा त्याने एक व्हिडीओ देखील शूट केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. टिकटॉक स्टार शॉन जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेला, त्यानंतर पुढे जे काही झालं ते पाहून प्रत्येक जण त्यांच्या नात्याची चर्चा करताना दिसून येत आहेत. ब्रेकअप झाल्यानंतरही आपला एक्स बॉयफ्रेंड आपल्या वाढदिवशी भेटीसाठी आला हे कळल्यानंतर एक्स गर्लफ्रेंड कॅटच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता.

टिकटॉक स्टार शॉनने त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटलाला केवळ भेटलाच नाही, तर एक गिफ्ट देखील घेऊन आला होता. हे गिफ्ट पाहून एक्स गर्लफ्रेंड कॅटचा रडू आवरलं नाही. तिचे डोळे पाणावले होते. हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. ब्रेकअप झाल्यानंतरही एकमेकांमध्ये प्रेम असू शकतं हे या व्हिडीओमधून दिसून आलं.

तर झालं असं की, टिकटॉक स्टार शॉनची एक्स गर्लफ्रेंड कॅट ही गेल्या अनेक दिवसांपासून कर्जबाजारी होती. तिच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. एव्हढं सारं कर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. कदाचित याची कल्पना एक्स बॉयफ्रेंड शॉनला आली होती. एक्स गर्लफ्रेंड कॅटच्या बॅंकेत कॉल करून शॉनने तिच्यावरील सर्व कर्ज फेडलं. एक्स गर्लफ्रेंड कॅटच्या वाढदिवशी तिला कर्जमुक्त करण्याचं अनोखं गिफ्ट शॉनने दिलं. हे अनोखं गिफ्ट पाहून कॅट सुद्धा आश्चर्यचकित झाली. आपल्या एक्स बॉयफ्रेंडने ब्रेकअपनंतरही तिचा विचार करून तिच्या डोक्यावरील कर्जाचा भार संपवून टाकला हे पाहून कॅट थोडी इमोशनल झाली. हे पाहून तिला तिच्या भावनांना आवर घालणं थोडं अवघड जात होतं. अखेर मनात दाटलेल्या भावनांनी डोळ्यातून अश्रु रूपातून वाट काढली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिकटॉक स्टार शॉनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरील नेटिझन्सना खूपच आवडलाय. त्याने हा व्हिडीओ त्याच्या टिकटॉक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत १५ हजार लोकांनी पाहिलंय. या व्हिडीओने लाखो लोकांचं मन जिंकून घेतलंय. व्हिडीओ बघितल्यानंतर काही युजर्सनी तर कमेंट करत शॉन अजुनही कॅटच्या प्रेमात असल्याचं सांगत आहेत. तर काही युजर्सनी शॉन आणि कॅटच्या नात्याला गोड म्हणत आहेत तर काही युजर्सनी मुर्खपणा असल्याचं म्हटलंय.