Viral video: बाप हा बाप असतो. मग तो आपला असो वा प्राण्यांचा. वडिलांची माया ही जगावेगळी असते. परिस्थिती कशीही असो मुलांसाठी झटतो तो बाप असतो. सध्या अशाच एका हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हत्तींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी त्यात ते आपल्या मजेशीर स्टाईलने लोकांना हसवत असतात. सर्वात बुद्धीमान आणि बलाढ्य प्राणी समजला जातो. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हत्तीने स्वत:चा आणि पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी केलेला हृदयस्पर्शी संघर्ष या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर हत्ती आणि पिल्लाच्या रेस्क्यूचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, हत्तीचं पिल्लू खोल खड्ड्यात पडलं आहे. आजूबाजूला खूप पाऊस पडल्यामुळे सर्वत्र चिखल झालेला आहे. अशा परस्थितीत हत्ती आणि हत्तीच्या पिल्लाला बाहेर येता येत नाहीये. बराच वेळ हत्तीचा बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरु आहे मात्र त्याला बाहेर पडता येत नाहीये. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक जीप जंगलातून जात असताना हत्तीनं अक्षरश: गुडघ्यांवर बसून आपल्या कुटुंबीयांसाठी मदत मागितली. लक्षवेधी बाब म्हणजे जीपमधील कर्मचारी देखील देखील लगेच त्या हत्तीसोबत घटनास्थळी पोहोचले.

बराच वेळ हत्तीचा बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरु असताना पशुवैद्य अधिकारी त्या ठिकाणी दाखल होतात आणि हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मुसळधार पावसामुळे त्यांच्या या बचावकार्यात बऱ्याच वेळा व्यत्यय येतो . चिखल खोदून पशूवैद्य अधिकारी दोघांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी जेसीबीचाही वापर करतात. शेवटी हत्तीला बाहेर काढण्यात यश येतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शांत वाटणाऱ्या हत्तीचा भयंकर राग; विदेशी महिलेला सोंडेत पकडून खाली फेकलं, घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. तसाच हा व्हिडीओसुद्धा. हा व्हिडीओ the_best_motivation_14 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा हत्ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी पशुवैद्य अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे.