बंगळुरु हे शहर देशात वाहतूक कोंडीसाठी ओळखले जाते. रोज सोशल मीडियावर बंगळुरूच्या वाहतूक कोंडीमधील व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाहतूक कोंडीतील अनेक किस्से समोर येत असतात. पण सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हा व्हिडीओ बंगळुरूमधील नसून गुरुग्रामधील आहे.
बंगळुरूप्रमाणेच गुरुग्राममध्ये लोक दिवसरात्र वाहतूक कोंडीमुळे वैतागले आहेत. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीमधून सुटका मिळवणे अवघड झाले आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला कल्पना आली असावी की गुरुग्रामध्ये रोज वाहतूक कोंडीची काय स्थिती असेल. व्हायरल व्हिडिओमध्ये एक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहे. जिथे नजर जाईल तिथे गाड्या दिसत आहेत. वाहतूक कोंडीचे हे दृश्य पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल आणि येथे राहणाऱ्या लोकांचे दुख समजू शकेल.
व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी ऐकले होते, बंगळुरूमध्ये खूप वाईट वाहतूक कोंडी होते. हॅलो गुरुग्राम! एक्स(ट्विटर)वर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे लोक आहा गुरुग्रामची तुलना बंगळुरूच्या वाहतूक कोंडीसह करत आहे.
हेही वाचा – औषध विक्रेत्याने चुकून दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, आईने तिच्या जुळ्या मुलांना गमावले
हेही वाचा – भररस्त्यात डोक्यावर मोठा ब्रेडचा ट्रे ठेवून सायकल चालवतोय ‘हा’ व्यक्ती, तरुणाचा बॅलन्स पाहून व्हाल थक्क!
गुरुग्रामचा हा वाहूतक कोंडीचा व्हिडीओ एक्स वापरकर्ता @VilasNayakने ४ ऑक्टोबरला शेअर केला होता १३ सेकंदाच्या या व्हिडीओ क्लिपपाहून लोक हैरान झाले आहेत. हा व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखपेक्षा जास्तवेळा पाहिले आहे. आता लोक या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले,” गुरुग्राममध्ये कधीतरीच असे होते पण बंगळुरूमध्ये रोज हिच स्थिती आहे” तर दुसऱ्याने लिहिले, “आधी बंगळुरुमध्ये १० पदरी रस्ता बनवा मग तुलना करा.”