मणिपूरमधील नववीच्या विद्यार्थानं करोना महामारीमध्ये एक गेम विकसित केला आहे. या गेमचं नाव त्यानं कोरोबोई असं ठेवलं आहे. या गेमची खासियत म्हणजे, करोनाच्या दिशानिर्देशावर आधारित आहे. कोरोबोई गेम विकसीत करणाऱ्या या १५ वर्षीय मुलाचं नाव बलदीप निंगथौजम असं आहे. सर्व एण्ड्रायड यूजर्ससाठी ही गेम उपलब्ध असणार आहे.

बलदीप निंगथौजम एका इथिकल हॅकर व्हायचेय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल सर्व माहिती जाणून घ्यायचं आहे. कोरोबोई गेम तयार करण्यासाठी चुलत्यांनी प्रोत्साहन दिल्याचं बलदीपनं सांगितलं.

बदलीपने कोरोबोई गेम तयार करण्यासाठी YouTube ची मदत घेतली होती. त्यानं YouTube वर गेम समज्यासाठी चार आठवडे घालवलं. गेल्या आठवड्यात बदलीपचा गेम पूर्ण झाला आहे. रविवारी बदलीपनं बोरोबोई गेम लॉन्च केला.