Sai Godbole Instagram Star: ‘खबरदार’, ‘माझा नवरा, तुझी बायको’ यांसारख्या धम्माल चित्रपटातून तसेच अधुरी एक कहाणी सारख्या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची लेक सुद्धा आता चित्रपटात पदार्पणासाठी तयार आहे. येत्या दिवाळीत पहिली वहिली ‘मिंग्लिश’ (मराठी+ इंग्रजी) मूव्ही ‘ती, मी आणि अमायरा’ मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यापलीकडे जर तुम्ही इन्स्टाग्राम रील वर ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला किशोरी गोडबोलेंच्या लेकीचा परिचय अगोदरच माहित असेल. ब्रिटीश, फ्रेंच, इटालियन, आणि वेगवेगळ्या परदेशी भाषांच्या लयीत बोलण्याची जादू तिला कमाल जमते, एवढंच नाही तर वेगवेगळ्या भाषांमधील गाण्याचं जॅमिंग, डान्स आणि अभिनय सगळ्यातच ती तरबेज आहे. कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल, तर, ही कलाकार आहे ‘सई गोडबोले’

लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरीजमध्ये अलीकडेच सईने हजेरी लावली होती. आपल्या आगामी चित्रपटाविषयी सांगताना सईने आपण इन्स्टाग्रामवर येण्याआधीच चित्रपटाचं शूटिंग केल्याचं सांगितलं तसेच या सिनेमात सईने पार्श्वगायन सुद्धा केलं आहे. आता तर सई एका मिनिटात इतक्या वेगवेगळ्या accent मध्ये बोलू शकते की तिचं टॅलेंट पाहून भलेभले थक्क होतात. मुंबईत राहून जगभरातील ऍक्सेंट सई कशी शिकली याचे काही खास खुलासेही तिने या गप्पांमध्ये केले आहेत. ऑस्ट्रेलियातील एका महिलेला ढासू अंदाजात धडा शिकवताना सईने स्वतःचं टॅलेंट कसं ओळखलं आणि अभिनयाचे शिक्षण घेण्याचा अनुभव कसा होता या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील व्हिडीओ आवर्जून पाहा.

Video: अभिनेत्री किशोरी गोडबोलेंच्या लेकीच्या आवाजात आहे जादू

हे ही वाचा<< ‘या’ प्रसिद्ध मराठी मालिकेचा लेखक होता श्रीमान लेजंड! महाराष्ट्रासाठी कलाकारांना दिलेला सल्ला ऐकून वाटेल अभिमान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला सईच्या सही गप्पा कशा वाटल्या? तिचं टॅलेंट ऐकून तुम्हीही थक्क झालात का? आणि येत्या व्हिडीओजमध्ये तुम्हाला कोणत्या इन्फ्लुएन्सरला भेटायला आवडेल याविषयी कमेंट करून कळवायला विसरू नका.