सध्या चार्ल्स शोभराजचं नाव चर्चेत आलं आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्याच्या सुटकेची समोर आलेली बातमी. नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने चार्ल्स शोभराजचं वय झाल्याने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशात एका मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याचं नावही चर्चेत येतं आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने सर्वात आधी चार्ल्स शोभराजला पकडलं होतं.

चार्ल्स शोभराजला पहिल्यांदा बेड्या घालणारे मराठमोळे पोलीस अधिकारी कोण?
१९७१ मध्ये मधुकर झेंडे यांनी चार्ल्स शोभराजला अटक केली. त्या काळात मधुकर झेंडे यांनी केलेली ही कारवाई खूप मोठी होती. कारण सीरियल किलर म्हणून कुख्यात असलेल्या चार्ल्स शोभराजला त्यांनी अटक केली . चार्ल्स शोभराज हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार होता. त्याला अटक करण्यासाठी व्यवस्थित शक्कल लढवून मधुकर झेंडे यांनी ही कारवाई केली होती.

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

चार्ल्स शोभराजला अटक केली तेव्हा मधुकर झेंडेंकडे बेड्याही नव्हत्या
चार्ल्स शोभराजला जेव्हा मधुकर झेंडेंनी अटक केली तेव्हा त्यांच्याकडे बेड्याही नव्हत्या. त्यांनी पिस्तुलाच्या कॉर्ड्स वापरून शोभराजला बंदी बनवलं. मधुकर झेंडे यांनी केलेल्या या कारवाईचं खूप कौतुक त्या काळी झालं होतं. तसंच त्यांनी बेड्या नसताना प्रसंगावधान दाखवत जी युक्ती लढवून शोभराजला बंदी बनवलं त्याचीही अनेकांनी प्रशंसा केली होती.

चार्ल्स शोभराज मधुकर झेंडेंना म्हणाला होता यु आर लकी
जेव्हा पहिल्यांदा शोभराजला अटक केली त्यानंतर काही वर्षात त्याने तुरुंगातून पोबारा केला. मात्र मधुकर झेंडे यांनी ६ एप्रिल १९८६ ला गोव्यातून चार्ल्स शोभराजला परत अटक केली. त्यावेळी त्याला बंदी बनवत असताना मीच तुला दुसऱ्यांदा अटक केली आहे असं त्यांनी शोभराजला सांगितलं. त्यावर चार्ल्स शोभराज त्यांना म्हणाला होता यु आर लकी!

मधुकर झेंडे यांचं छायाचित्र, सौजन्य-मधु झेंडे फेसबुक पेज

मधुकर झेंडे कोण आहेत?
मुंबई पोलिसातले एक तडफदार पोलीस अधिकारी म्हणून मधुकर झेंडे ओळखले जात. भलेभले गुन्हेगार त्यांच्या नावाने चळाचळा कापायचे. भारदस्त आवाज ही मधुकर झेंडे यांची ओळख होती. मधुकर झेंडे हे मुळचे पुण्याचे पण २५ वर्षांहून अधिक काळ ते मुंबई पोलीस खात्यात काम करत होते. एवढंच काय चार्ल्स शोभराजला अटक करणाऱ्या या मराठमोळ्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी त्यावेळी पंतप्रधान असलेले राजीव गांधीही आले होते. लोकांच्या सेवेच्या उद्देशानेच एक पोलीस अधिकारी म्हणून झटले.

मधुकर झेंडे यांच्या फेसबुक पेजवर हा फोटो आहे

चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर का म्हटलं जातं?
चार्ल्स शोभराज या सीरियल किलरला बिकिनी किलर असंही म्हटलं जातं त्यामागेही एक कारण आहे. १९७० च्या दशकात चार्ल्स शोभराजने अनेक हत्या केल्या. त्यात जेव्हा महिलांचे मृतदेह मिळाले त्या मृतदेहावर फक्त बिकिनी होती. त्यामुळेच चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर असंही संबोधलं जातं. पोलिसांना चकमा देण्यातही तो पटाईत होता. मात्र आता त्याचं वय झाल्याने त्याला सोडण्यात आलं आहे.

वेश बदलण्यात चार्ल्स शोभराज पटाईत
वेश बदलण्यात चार्ल्स शोभराज एकदम पटाईत होता. त्याने अनेक महिला पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. १९७६ ला त्याला दिल्लीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं. १९८६ ला शोभराज जेलमधून पळाला होता. तिहार तुरुंगात त्याने त्याच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. त्यावेळी त्याने जी मिठाई आणि केक वाटले होते त्यात गुंगी येणारं औषध मिसळलं होतं. तुरुंगातल्या सगळ्या गार्ड्सना त्याने ही मिठाई खाऊ घातली. या सगळ्यांची शुद्ध हरपल्यानंतर शोभराज जेलमधून पळून गेला होता.