जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यामुळे आज आपण घरबसल्या एकमेकांशी जोडलेले आहोत आणि व्हाट्सॲप, फेसबुक या सोशल मीडिया ॲपवर हवा तेवढा संवाद साधून वेळ घालवतो आहोत. मार्क झुकरबर्ग सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतात. आज मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या लेकीसोबत फोटो शेअर केले आहेत. याआधीही त्यांनी एआयच्या (AI) मदतीने आपल्या मुलीचे केस बांधले होते आणि पहिल्यांदा वेणी बांधण्याचा अनुभव शेअर केला होता.
फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या लेकीसोबत एक फोटो शेअर केला आहे. मार्क झुकरबर्ग हे त्यांच्या लेकीसोबत फिरायला गेले होते. त्यांनी रोड ट्रिपदरम्यान एका अनोख्या ठिकाणाला भेट दिली. तेथे त्यांनी काही विशाल झाडाचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत मार्क झुकरबर्ग व त्यांची मुलगी कॅमेऱ्याकडे पाठ करून उभे आहेत आणि झाडाच्या विशाल खोडाकडे पाहताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोत हे दोघे एका उंच झाडासमोर उभे राहून कॅमेऱ्याकडे बघत हसताना दिसत आहेत. मार्क झुकरबर्ग यांनी शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…जपानचे दोन तरुण चालवतात ‘तडका’ हॉटेल! दर सहा महिन्यांनी देतात चेन्नईला भेट…
पोस्ट नक्की बघा :
दोन हजार वर्षांपेक्षा जास्त जुने आहे झाड :
रोड ट्रिपदरम्यान मार्क झुकरबर्ग यांनी जायंट सेक्विया (Giant Sequoias) विशाल झाडे पाहिली आणि त्यांच्या मोबाईलमध्ये आपल्या मुलीसोबत फोटो काढून घेतले. तसेच या झाडांचे वैशिष्ट्य म्हणजे ही झाडे दोन हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत.जायंट सेक्वियाहे जगातील सर्वांत मोठे वृक्ष आहेत. या झाडांना विशिष्ट लाल किंवा केशरी रंगाची साल असते; ज्यामुळे ते इतर झाडांपेक्षा वेगळे दिसतात आणि तसेच ही झाडे दोन हजार वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत म्हणून ओळखली जातात.
सोशल मीडियावर ही पोस्ट @zuck यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. तसेच मुलीसोबत खास फोटो शेअर करून या झाडाचे खास वैशिष्ट कॅप्शनमध्ये सांगितले आहे. तसेच ही पोस्ट पाहून अनेक जण बाबा-लेकीच्या खास क्षणाचे कौतुक करीत आहेत; तर काही जण या झाडांचे वैशिष्ट्य पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या खास क्षणाने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.