Viral Video : मार्क झकरबर्गचे ‘कॉलेज के वो दिन..’

१५ वर्षांपूर्वीची एक आठवण शेअर केली

मार्कला हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला होता त्यावेळची ही आठवण आहे

मार्क झकरबर्ग याने आपली कॉलेजच्या दिवसातली एक सुंदर आठवण फेसबुकवर शेअर केली आहे. फेसबुकचा संस्थापक मार्कने कॉलेजमध्ये असतानाच शिक्षणाला राम राम ठोकला होता. हार्वर्डमधला नापास विद्यार्थी म्हणून ज्याची चेष्टा केली जायची त्याच मार्कने सगळ्यात मोठी सोशल नेटवर्किंग साईट तयार केली. मार्क आजवर फेसबुकवर त्याच्या बालणीपासून ते आतापर्यंतच्या अनेक आठवणी शेअर करत आलाय. यावेळी त्याने कॉलेजच्या दिवसातली १५ वर्षांपूर्वीची एक आठवण शेअर केली.

मार्कला हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला होता त्यावेळची ही आठवण आहे. आपल्या खोलीत बसून मार्क आपले ई-मेल तपासत होता आणि त्याचे बाबा कौतुकाने मार्कचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. अनपेक्षितरित्या हार्वर्डमधून मार्कला ई-मेल आला. विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचा तो ई-मेल होता. ई-मेल वाचून मार्कला इतका आनंद झाला की त्याच्या वडिलांनी हा अनमोल क्षण आपल्या कॅमेरात टिपला. आज पंधरा वर्षांनंतर मार्कने हा व्हिडिओ शेअर करत ‘कॉलेज के वो दिन’ पुन्हा एकदा शेअर केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mark zuckerberg share harvard memory