सोशल मीडियात गेल्या काही दिवसात लग्नाचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या ना त्या कारणामुळे या व्हिडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. असात एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लग्न समारंभ सुरु असताना दुसऱ्याने नवरीला लग्नाची मागणी घातली त्यामुळे मंडपात उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही कृती पाहून नवराही काही स्तब्ध राहिला. मग त्याने होणाऱ्या पत्नीला इशारा करून सांगितले आणि मंडपात एकच हशा पिकला.
व्हायरल व्हिडिओमध्ये वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. तेव्हा एक तरुण वधूला प्रपोज करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वधूला प्रपोज करणारा तरुण वराचा मित्र असल्याचे दिसत आहे. लग्न म्हटलं की वराचे मित्रांचा उत्साह वेगळाच असतो. होणारी वहिणी आणि लग्न मंडपातील मुलींचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळी कृत्य करत असतात. त्यामुळे लोकांना हसू आवरत नाही. वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. या दरम्यान, वराच्या हातात गुलाबाचे फूल आहे आणि तेथे उभे असलेले लोक वराला आपल्या वधूला प्रपोज करण्यास सांगतात. दरम्यान, अचानक वराचा मित्र स्टेजवर पोहोचतो आणि गुडघ्यावर बसलेल्या वधूला प्रपोज करतो. हे पाहून नातेवाईकही आश्चर्यचकित होतात.
दुसरीकडे, वराला माहित आहे की त्याचा मित्र विनोद करत आहे, त्याला काही फरक पडत नाही. तो वधूला त्याच्या मित्राच्या हातातून गुलाब घेण्यासही सांगतो. व्हिडिओमध्ये तुम्ही वराला हसताना पाहू शकता. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि शेअर करत आहेत.