जिगरबाज बाप काय असतो, याचा प्रत्यय खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधून आलाय. डोक्यावर इमारतीचा भाग कोसळणार इतक्यात आपल्या लेकराला वाचवण्यासाठी बापाने पत्कारलेली जोखीम सध्या चर्चेचा विषय आहे. पण जिगरबाज बापाने नियतीला हरवत आपल्या मुलाचा जीव वाचवला आहे. या जिगरबाज बापाचं सध्या कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक इमारतीखाली एक व्यक्ती आपल्या लहान मुलासोबत स्कुटीवर बसलेला दिसून येतोय. स्कुटीवर बसलेलं असताना या बापाला वरच्या बाजूने इमारतीचा कसला तरी आवाज येऊ लागल्याने तो वर पाहतो. जणू काही या बापाला पुढे होणाऱ्या अपघाताची कुणकुण लागली होती. वेळीच या जिगरबाज बापाने प्रसंगावधान दाखवले आणि आपल्या स्कुटीवर बसलेल्या लेकाला उचलून बाजुला होण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी जे घडायचं ते घडतंच.

आणखी वाचा : इतक्या मोठ्या पाळण्यात हा लहान मुलगा एकटाच बसला होता, VIRAL VIDEO पाहून नेटकरी पालकांवर संतापले

या व्हायरल व्हिडीओमधला बाप आपल्या मुलाला घेऊन बाजुला होण्याचा प्रयत्न करत होता, इतक्यात इमारतीच्या वरचा भागाचा ढिगारा कोसळतो. या व्हिडीओमधील दृश्य पाहून एका वेळसाठी असं वाटू लागतं की हे दोघेही बाप-लेक या ढिगाऱ्याखाली आले असावेत. पण व्हिडीओमधील पुढील दृश्य पाहून सर्वांच्या जीवात जीव येतो. हा जिगरबाज बाप आपल्या लेकाला सुरक्षित रित्या बाजुच्याच दुकानात घेऊन येतो. हे पाहून आजुबाजुने जाणाऱ्या लोकांनी धाव घेत त्याची मदत करू लागतात. यात बापाला पाठीवर जखमा झाल्यामुळे तो कळवळतो पण लेकाला सुखरूप पाहून तो सुटकेचा श्वास घेतो.

आणखी वाचा : रस्त्यावर चालताना दिसून आला हा रहस्यमयी प्राणी, हा VIRAL VIDEO सारेच जण आश्चर्यचकित

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : द्राक्षांपासून पॉपकॉर्न बनवलेलं तुम्ही कधी पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा आहे. हा व्हिडीओ Benarasiyaa नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. लोक या व्हिडीओवर बापाच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधल्या मथुरामधला असल्याचं सांगण्यात येत आहे.