मांजरीवर प्रेम करणाऱ्या पुरुषांसाठी हार्ट ब्रेक करणारी बातमी आहे. कारण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, मांजरी आवडणाऱ्या पुरूषांना महिला डेट करत नाहीत. कोलोरॅडो स्टेट यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात असं आढळून आलेय की, मांजरीवर प्रेम करणारे पुरूष महिलांना कमी आवडतात. कोलोरॅडो स्टेट यूनिवर्सिटीतील तज्ज्ञांनी काही महिलांना मांजरीसोबत आणि मांजरीशिवाय असलेल्या शेकडो पुरुषांचे फोटो दाखवले. यामध्ये अनेक महिलांनी मांजरीसोबत नसलेल्या पुरूषांना पसती दर्शवल्याचे पहायला मिळाले. मांजरीसोबत असलेल्या पुरूषांना महिलांनी पसंती दर्शवली नाही.

कोलोरॅडो स्टेट यूनिवर्सिटीनं १८ ते २४ वयोगटाकील ७०८ महिलांचं ऑनलाइन सर्वेक्षण केलं. यामध्ये मांजर आवडत नसलेल्या पुरूषांना जास्तीत जास्त महिलांनी पसंती दर्शवली आहे. संशोधनानुसार, मांजरी आवडणारे पुरुष हे महिलांना आकर्षक आणि मादक वाटत नाहीत. इतकेचं नाही तर या पुरुषांना मानसिक आजार आहे तसेच यांच्यासोबत आपलं पटणार नाही, याचबरोबर अशा पुरुषांसोबत चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचा (गैर)समज महिलांमध्ये आहे.

कोलोरॅडो स्टेट यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, मांजरी नसलेल्या पुरूषांच्या फोटोंना महिलांनी आधिक पसंती दर्शवली आहे. ३८ टक्के महिलांना मांजरी नसलेल्या पुरूष आवडतात. तर ३७ टक्के महिला अशा पुरुषांसोबत सिरिअस रिलेशनशीप करण्याची इच्छा आहे. त्याच पुरूषाचा मांजरीसोबत फोटो असल्यास परस्परविरोधी मतं पडली आहेत. अनेक महिलांनी अशा पुरूषांना रिजेक्ट केलं आहे. तसेच विचारलेल्या प्रत्येक प्रश्नामध्ये सरासरी ३३ टक्के मतं कमी पडली आहेत. ९ ते १४ टक्के महिलांनी अशा पुरूषांसोबत कधीही रिलेशन ठेवण्यास आवडणार नसल्याचं म्हटलेय. या तुलनेत दुसऱ्या विषयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मांजरीसोबत असणाऱ्या पुरूषांच्या काही फोटोंना महिलांनी पसंती दर्शवली पण जोडीदर म्हणून त्यांना नकार दिला आहे. एकट्या व्यक्तीचा फोटो पाहिल्यानंतर ४१% जणींनी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये जाण्यास नकार दिला. पण मांजरीसोबत त्याचा फोटो पाहिल्यानंतर यामध्ये वाढ झाली आणि ४५% जणींनी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये जाण्यास असहमती दर्शवली.