वाहतुकीचे नियम मोडणे भारतीयांसाठी नवीन नाही. नियम हे जणू मोडण्यासाठीच असतात अशा आविर्भावात वाहनचालक नियम मोडताना दिसतात. मुंबईमध्ये नुकताच अशीच एक घटना घडली आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरुन जाताना घेण्यात येणारा टोल वाचवण्यासाठी मर्सिडीजच्या कारचालकाने काय केलं ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. आता सी लिंकवरुन इतकी महागाची गाडी घेऊन जाताना केवळ ६० रुपयांच्या टोलसाठी त्याने असे का केले असावे असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल.

तर, या ‘मर्सिडीजवर प्रोटोकॉल स्टिकर होता. तर ड्रायव्हरने सादर केलेल्या पत्रात कारला सर्व ठिकाणी टोलमाफी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला सांगितलं. मुंबई एन्ट्री पॉईंट्सवर डिसेंबर २०१८ पर्यंत संबंधित मर्सिडीजला टोलमाफी असल्याचा उल्लेख पत्रात होता. त्यावर एमईपीएलचा लोगो आणि संघटनेच्या उपाध्यक्षांची स्वाक्षरीही होती.

टोल कर्मचाऱ्याला या पत्राबाबत संशय आल्याने त्याने पत्राचा फोटो तो आपल्या वरिष्ठांना पाठवला. मात्र तोपर्यंत टोलनाक्यावर वाहतूकीचा खोळंबा झाल्याने ती कार सोडून देण्यात आली होती. या पत्राचा खुलासा झाल्यानंतर ते पत्रं बनावट असल्याचे समोर आले. आणि टोल वाचविण्यासाठी कारचालकाने अनोखी शक्कल लढविल्याचे समजले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून पसार झालेल्या कारचालकाचा शोध सुरु आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्र सादर केल्याचा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.