‘मायक्रोसॉफ्ट पेंट’ Microsoft Paint विषयीच्या अनेक आठवणी तुमच्या मनात असतील. शाळेत जेव्हा आपण ‘कॉम्प्युटर’ हा विषय शिकत होतो तेव्हा त्यात ओघानं ‘पेंट’ हा विषय असायचाच. चित्रकलेच्या वहिवर जसे कुंचले, पेन्सिल रंगांच्या मदतीने सुंदर चित्र रेखाटता यायची तशीच चित्रं आपण माऊसच्या मदतीनं कॉम्प्युटरवर काढू शकतो हे जेव्हा आपल्याला समजले तेव्हा केवढं अप्रुप वाटलं होतं आपल्याला. एरव्ही ज्यांना कागदावर गोल आकारही काढायला जमायचा नाही त्यांना पेंटमुळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर काही सुबक आकृत्या तरी काढता आल्या. आता हे वाचताना अनेकांना कॉम्प्युटर लॅबमधले दिवस आठवले असतील. आजच्या घडीला हे सारं नव्यानं आठवण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला असेल तर एक वाईट बातमी अशी आहे की मायक्रोसॉफ्ट ‘पेंट’ paint हे अॅप्लिकेशन बंद करण्याच्या विचारात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायक्रोसॉफ्टने विंडोज १० Windows 10 साठी काही नवीन अपडेट्स आणल्या आहेत. त्यानुसार पेंट या अॅप्लिकेशनची विभागणी एका प्रकारात करण्यात आलीये. या प्रकारात असणाऱ्या अॅपबाबत भविष्यात कोणत्याही डेव्हलपमेंट होत नाहीत किंवा हे अॅप काढून तरी टाकले जातात, असा त्याच्या अर्थ होतो. पण आता पेंट उपलब्ध होणारच नाही असं नाही. मायक्रोसॉफ्टने पेंट ३ डीचा पर्याय आणला आहेच. ज्यामुळे तुम्ही पेंट अॅप्लिकेशनवर काढलेल्या चित्रांना थ्रीडी इफेक्ट मिळणार आहे, पण गेल्या ३२ वर्षांपासून आपण जे पेंट वापरत आलोय ते मात्र यापुढे आपल्याला दिसणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft killed off paint after 32 years
First published on: 25-07-2017 at 10:32 IST