बहुतेकांना तरुणांना पिझ्झा आवडतो. त्यावर आवडे टॉपिन्स तर आवर्जून टाकले जातात. पिझ्झासोबत जस कोका-कोलाचा ग्लास हवाच तसचं अर्थातच ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्सचे हवेचं. परंतु, तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत पिझ्झाचा स्लाइस खाण्याची कधी कल्पना केली आहे का? असाच एक हटके कॉम्बीनेशनचा प्रयोग युट्युबर विशाली खुराणा हिने केला. तिने पुदिन्याच्या चटणीमध्ये बुडवून पिझ्झा खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला ८४ हजारापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि यावर नेटिझन्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय आहे नक्की व्हिडीओमध्ये?

आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विशाली खुराना पिझ्झावर शिंपडण्यासाठी ओरेगॅनोची बाटली उचलताना दिसत आहे. मात्र, ती थांबते आणि मिंट सॉस अर्थात पुदिन्याच्या चटणीची वाटी उचलते आणि पिझ्झावर चटणी टाकते. “कसं वाटलं कॉम्बीनेशन?” तिने व्हिडीओला कॅप्शन दिले.

( हे ही वाचा: याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सरळ सरळ नेटीझन्स विभाजले आहेत असं दिसून येत. काहींना हे कॉम्बीनेशन आवडलं आहे. अनेकांना हे कॉम्बीनेशन ट्राय करायचं आहे. तर काहींना हे कॉम्बीनेशन अजिबात आवडलेला नाही.
तुम्हाला आवडेल का हे कॉम्बीनेशन ट्राय करायला?