मुंबई, दिल्ली, पुणे इथे राहणाऱ्या किंवा या शहरात एकदा तरी जाऊन आलेल्या लोकांनी तिथल्या ट्रॅफिकचा अनुभव नक्कीच घेतला असेल. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर तासनतास एकाच ठिकाणी अडकून राहणे सर्वांनाच त्रासदायक वाटते. त्यात लवकर ट्रॅफिकमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत अनेकजण ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करत आणखी ट्रॅफिक वाढवतात आणि त्यात सातत्याने वाजणारे हॉर्न यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. असा अनुभव तुम्हीहो घेतला असेल, पण सध्या व्हायरल होणारा ट्रॅफिकचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ मिझोराममधील ऐझॉलयेथील आहे. या व्हिडीओमध्ये ट्रॅफिक दिसत आहे, मात्र याचे स्वरूप नेहमीपेक्षा वेगळे आहे. कारण यात गाड्या एका रेषेत जात असल्याचे दिसत आहेत. बाइकही इतर गाड्यांना ओव्हरटेक न करता एका रेषेत जात असल्याचे दिसत आहेत. ट्रॅफिकचे असे स्वरूप तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: मुंबईमधील रिक्षाचालकाने चक्क ऐकवली युरोपीय देशांची यादी; Viral Video पाहून नेटकरीही झाले अवाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिझोराममधील या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत असून, या व्हिडीओला ५७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रत्येक शहरामध्ये असे नियमांचे पालन व्हायला हवे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.