नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र दिसत असून पक्षाच्या अस्तित्वासंदर्भातच आता राजकीय वर्तुळामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे मुंबईत मात्र मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला बॅनर्सच्या माध्यमातून डिवचलं आहे. राज ठाकरे आणि अयोध्येमधील राम मंदिराचा फोटो असणारे बॅनर्स भानुशाली झाली आपल्या विधानसभा क्षेत्रात झळकावले आहेत. या बॅनर्सवर “त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?” असा प्रश्न विचारला आहे.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: भाजपाने राज्यपालांना पाठवलेलं पत्र जसंच्या तसं – “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राजीनामा देण्याची…”

मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१७ साली मनसेचे सात नगरसेवक असताना शिवसेनेने त्यातील सहा नगरसेवकांचा गट फोडला होता. त्याच राजकीय घडामोडीची आठवण या बॅनर्सच्या माध्यमातून भानुशाली यांनी करुन दिलीय. याचसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना भानुशाली यांनी, “मी राजनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी राजभक्त आहे. म्हणून मला वाटलं की त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे. एकनाथ शिंदे तुमचे ३६ आमदार घेऊन गेले. म्हणजे सहा गुणीले सहा. याचा अर्थ सहा पट देवाची लाठी तुम्हाला लागलेली आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीय.

satara lok sabha seat, mahesh shinde, sharad pawar, mahesh shinde Criticizes sharad pawar, Nominating shashikant shinde, Candidate in Satara, sharad pawar ncp, lok sabha 2024,
सातारा: शरद पवारांना यशवंत विचारांवर बोलायचा अधिकार नाही-महेश शिंदे
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
balasaheb thackeray, eknath shinde, contest thane lok sabha seat 2009, mp rajan vichare, instagram reel, eknath shinde denied balasaheb thackeray, eknath shinde shivsena, udhhav thackeray shivsena, lok sabha 2024, election 2024, thane politics, thane news,
एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांनी लोकसभा लढविण्यास सांगितले होते, पण त्यांनी नकार दिला – खासदार राजन विचारे
Hatkanangale lok sabha constituency, 2024 election, sugar mill owners, farmers leader raju shetti
हातकणंगलेत पुन्हा एकदा साखर कारखानदार – शेतकरी नेत्यात लढत

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : एवढे मंत्री, आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे?; शरद पवार संतापले

पुढे बोलताना, “काही दिवसांपूर्वी एकच बातमी चालायची की आम्ही खरे हिंदूत्व ते खोटे हिंदूत्ववादी. पूर्ण भारताने राज ठाकरेंच्या रुपाने कट्टर हिंदूत्ववादी नेता पाहिला. मात्र आज कशी परिस्थिती झालीय की तुमचेच आमदार सांगतायत तुम्ही हिंदूत्व सोडल्याने आम्हाला इथं जावं लागलं आहे.
सगळ्यांना माहिती पडलं की खरा हिंदूत्ववादी नेता राज ठाकरे आहेत,” असंही भानुशाली म्हणालेत.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी

नक्की वाचा >> विश्लेषण : ठाकरे सरकार पडलं तर कशी असतील सत्तास्थापनेची समीकरणं?

तसेच भानुशाली यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनाही एक सल्ला दिलाय. “मी एकनाथ शिंदेंना एवढं सांगणार आहे की, आमदार घ्या पण तपासून घ्या. नाहीतर असं होणार आमच्याकडून फायदा नाही झाला म्हणून ते शिवसेनेत गेले. तुमच्याकडे फायदा अधिक होणार म्हणून आता ते तुमच्याकडे येणार. परत उद्धव ठाकरेंनी उद्या काही आमिष दाखवलं तर तिकडे जाणार. म्हणून तपासून घ्या एवढीच माझी विनंती आहे,” असं भानुशाली यांनी म्हटलंय.