महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून जिकडे तिकडे त्याचीच चर्चा होत आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या सेलिब्रिटींपासून साधु – साध्वीपर्यंत बरेच लोक चर्चेत येत आहे. याच कुंभ मेळ्यात माळा विकणारी सर्व सामान्य तरुणी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुंदर डोळे, रेखीव चेहरा आणि आपल्या साधेपणाने तिने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. एका रात्रीत प्रसिद्ध झालेल्या इंदूरमधील १६ वर्षीय माळ विक्रेत्या तरुणीचे नाव मोनालिसा भोसले असे आहे. मोनालिसा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यापासून तिचे एकापाठो एक नवीन व्हिडिओ समोर येत आहे. इंटरव्ह्यू घेण्यासाठी अनेक युट्यूबर अक्षरश: तिच्या मागे मागे धावत आहे ज्यामुळे तिच्यावर आतातोंड लपवण्याची वेळ आली आहे. काही लोक तिच्या तंबूत शिरले आणि तिच्या भावाला मारहाण केल्याचा आरोप देखील मोनालिसाने एका व्हिडीओत केला आहे. दरम्यान आता तिचा नवा व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये मोनालिसा वाढदिवस साजरा करत आहे.

२१ जानेवारी रोजी मोनालिसाने आपला वाढदिवस आपल्या कुटुंब आणि मैत्रिणींबरोबर साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आणि ज्यांना लाखोंपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. एका व्हिडिओमध्ये, मोनालिसा केक कापताना दिसत आहे तर तिचे प्रियजन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Monalisa (@monibhosle8)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोनालिसाच्या प्रसिद्धीची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा महाकुंभमेळ्यात एका इन्फ्ल्युएन्सरने तिच्याकडून विकत घेताना व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. बघता बघता मोनालिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मोनालिसाचे व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या सुंदर हास्य आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणारा महाकुंभमेळा हा १४४ वर्षांनंतर घडणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. याने केवळ संत आणि ऋषींनाच नव्हे तर सोशल मीडियावरील प्रभावशाली लोकांनाही आकर्षित केले आहे, जे या कार्यक्रमाचे विविध व्हिडिओ तयार आणि शेअर करत आहेत.