Viral video: सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी अनेक व्हिडीओ प्राण्यांचे असतात. आता जंगलातील प्राणीदेखील मानवी वस्तीत वावर करताना दिसून येतात. काही जंगली प्राण्यांमुळे मानवी वस्तीत आता भीतीचं वातावरण पहायला मिळतं. फिरता फिरता प्राणी कधी हल्ला करतील याचा काही नेम नाही. काही प्राणी अधिक भयानक असतात, एखाद्या माणसाला पाहिल्यानंतर ते त्यांच्या अंगावर हल्ला करण्यासाठी धावतात. माकडाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओही समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, यामध्ये माकडाने चक्क चालत्या स्कूटी चालकाच्या अंगावर झडप घेतली. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः धडकीच भरेल.

समोर आलेला हा माकडांच्या हल्ल्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, माकड रस्त्यानं जाणाऱ्या स्कूटीवर जावून बसला. या स्कूटीचा चालक त्या माकडाला खाली उतरण्याची विनंती करतोय. पण ते माकड काही ऐकायला तयार नाही. माकडानं त्या व्यक्तीचा चष्मा घेतला. त्यानंतर आता तरी मला सोड बाबा म्हणत काकांनी विनंती केली तरीही माकड उठायचं नाव घेत नाहीये. हा व्यक्ती आजूबाजूला असणाऱ्या लोकांना माकडाला बाजूला करायला विनंती करत आहे मात्र कुणीही पुढे येण्याचं धाडस करत नाहीये. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल. माकड हा अत्यंत खोडकर प्रवृत्तीचा प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यानं या काकांना अक्षरश: हतबल करुन ठेवलं आहे.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Car Ridden Boys Throw Water Balloons at people on a busy in road delhi viral video
बापरे! भर रस्त्यात चालत्या कारमधून लोकांच्या अंगावर फेकले पाण्याचे फुगे, तरुणांचा संतापजनक प्रकार; व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भर रस्त्यात कसा पडला तब्बल ७ मीटर लांब आणि ५ मीटर रुंद खड्डा? धावती कार मधोमध लटकली; VIDEO व्हायरल

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकजण व्हिडीओची मजा घेत मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स खूप हसत आहेत. एका यूजरने म्हटले, ‘आम्ही मुले आहोत सर. आमच्या बाबतीत असेच घडते.